computer

या आजीबाईंचे हेल्दी डाएट : या दोघी रोज खातात 2 किलो माती!! 

आपण सगळ्यांनीच लहानपणी  आजूबाजूच्या लोकांचा डोळा चुकवून  माती खाल्लीय. एवढंच काय, सगळ्यांनीच शाळेत जात असताना पेन्सिली वापरून कमी आणि खाऊन जास्त संपवल्या असतील. पण या दोन बायकांची कहाणीच वेगळी आहे. कशी ते आता वाचाच..

या जगात सापडतील तितके नमुने थोडेच असतात. त्यांच्या चित्रविचित्र करामती पाहून देवही कधीकधी तोंडात बोट घालत असेल. असल्याच दुर्मिळ प्रजातीच्या या दोन आजीबाई  आपल्या भारतात आढळतात, ज्या गरम गरम तूप-भात खायचं सोडून माती खातात!

 

या आहेत कुसुमावती नावाच्या आजी. वय वर्षे ७८, मुक्काम पोस्ट - वाराणसी. 

   या आजी वयाच्या १५व्या वर्षापासून म्हणजे गेली ६३ वर्षे दररोज २ किलो माती खात आहेत. आणि आपल्या निरोगी आयुष्याचं श्रेय त्या या मातीलाच देतात.

या आजीबाईं रोज वाराणसीच्या आसपास रेती शोधत फिरतात.  जर ती नाही मिळाली तर म्हणे त्या आपल्या घरची भिंतही कुरतडायला मागेपुढे पाहात नाहीत. त्या आजही शेतात राबतात. आणि माती खाऊन त्यांना खूप सारी खनिजोंही मिळतात म्हणे, म्हणून तर त्यांनी आजपर्यंत डॉक्टरचं तोंडही पाहिलं नाहीय.

या दुसर्‍या आजीबाई तर चक्क ९२ वर्षांच्या आहेत. यांनी तर फक्त १० वर्षांच्या असताना पैजेखातर माती खाल्ली होती. आणि तेव्हापासून आजतागायत, म्हणजे ८२ वर्षे हा यज्ञ सुरुच आहे.

सुदामा देवी रोज 4 प्लेट्स माती फस्त करतात. यांनी सुध्दा आपल्या धडधाकट प्रकृतीवर या मातीचेच उपकार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळं यांनाही कधी डॉक्टरची गरज भासली नाही.

पाण्यात टाकून, मातीत पदार्थ बुडवून वैगेरे विविध स्वरूपात त्या मातीचे सेवन करत असतात. त्यांना ७ अपत्ये आहेत.

मातीत खेळल्याशिवाय आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढत नाही वगैरे गोष्टी ठीक आहेत. मातीत कधी ना कधी हात घालावेत असंच आमचंही म्हणणं आहे. पण म्हणून रोज  माती खाणं जरा अवघडच आहे. नाही का?

सबस्क्राईब करा

* indicates required