computer

रेल्वेच्या जुन्या डब्याचा याहून चांगला उपयोग पाहिलाय का कुठे?

‘आम्हाला उपहारगृह पाहिजे’ या मागणीवर‘पूर्व मध्य रेल्वे’ विभागाने एक अफलातून कल्पना शोधून काढली आहे. त्यांनी उपयोगात नसलेल्या रेल्वेच्या डब्याचं रुपांतर चक्क कॅफेमध्ये केलं आहे.

दानापूर कोचिंग डेपोच्या आजूबाजूच्या परिसरात लहानसं हॉटेल किंवा कॅफे नव्हता. सध्या चहासाठी  कर्मचाऱ्यांना लांबवर जावं लागायचं. त्यामुळे कर्मचाऱ्यांची नेहमीच तक्रार असायची. हे लक्षात घेऊन रेल्वे विभागाने नव्या कॅफेची निर्मिती झाली आहे. एकावेळी ४० लोक बसू शकतील एवढी  जागा या कॅफेत आहे. रेल्वेच्या वतीने डब्याची आतील बाजू बदलण्यासाठी विशेष मेहनत घेण्यात आली आहे. भिंतींवर चित्र काढण्यात आली आहेत, सुशोभीकरणासाठी जुन्या वस्तू जसे की टाईपरायटर, दानापूर रेल्वे स्टेशनचा जुना फोटो लावण्यात आला आहे.

सध्या हा छोटासा कॅफे प्रायोगिक तत्त्वावर चालवला जात आहे. त्याला मिळणारा प्रतिसादही कमालीचा आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी या कल्पनेचं स्वागत केलंय. विशेष म्हणजे रेल्वे किंवा बस स्थानकावर असते तशी अस्वच्छता या कॅफेमध्ये नाही. स्वच्छता आणि आरोग्यदायी वातावरणासाठी खास काळजी घेण्यात आली आहे.

तर मंडळी, हे तर झालं कॅफे पुरतं. रेल्वे डब्यांचा वापर करून आपण आणखी काय काय नवीन करू शकतो? तुम्हाला काय वाटतं?

सबस्क्राईब करा

* indicates required