computer

इंडोनेशियातील आकाश लालभडक कसे झाले ? हा फोटो किती, खरा किती खोटा ?

मंडळी, नारंगी रंगातलं आकाश तुम्ही नक्कीच बघितलं असेल, पण कधी लालभडक आकाश बघितलंय का ? इंडोनेशियातील लोकांसाठी २३ डिसेंबरचा दिवस हा लालभडक रंगातला होता. हे फोटो पाहा.

हे फोटो इंटरनेटवर आल्यानंतर बऱ्याचजणांना या फोटोंच्या खरेपणाबद्दल शंका वाटली. पण थोड्याचवेळात हे सिद्ध झालं की हे फोटो खरे आहेत. सूर्यप्रकाश आणि हवेत असलेल्या धुरातील कणांचा एकमेकांशी संपर्क आल्याने संपूर्ण वातावरण लाल रंगाचं झालं होतं. याला वैज्ञानिक भाषेत Rayleigh scattering म्हणतात.

मंडळी, हे फक्त दिसण्यापुरतं मर्यादित नव्हतं, तर त्याचा तिथल्या नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला. एका नागरिकाने म्हटलंय की लाल रंगामुळे त्याच्या डोळ्यांना आणि घशाला त्रास झाला होता.

हा चमत्कार ज्या धुरामुळे झाला त्याबद्दल जाणून घेऊया.

इंडोनेशियाला निसर्गाने भरभरून दिलं आहे, पण सध्या शेती आणि उद्योगांमुळे तिथला निसर्ग आटत चाललाय. जुलै ते ऑक्टोबर या काळात तिथे कोरडं हवामान असतं. याचा फायदा घेऊन कंपन्या आणि लहान शेतकरी जंगल साफ करू लागतात. जाळा आणि शेती करा या जुन्या पद्धतीवर इंडोनेशियाची शेती अवलंबून आहे. हा प्रकार तिथे बेकायदेशीर आहे, पण तो थांबलेला नाही.

जमीन साफ करण्यासाठी जी आग लावली जाते त्याने धुराचे लोट उठतात. इंडोनेशियाने इतिहासात कधीही न बघितलेलं आगीचं तांडव यावर्षी दिसून आलं. आतापर्यंत ८,००,००० पेक्षा अधिक भूभाग हा जाळून गेलेला आहे. धुरामुळे परिस्थिती इतकी बिघडली होती की ६ प्रांतांमध्ये आणीबाणी पुकारण्यात आली.

तर मंडळी, इतिहासात कधीही न दिसलेला ‘लाल दिवस’ इंडोनेशियाने पाहिला पण त्यासाठी त्यांना निसर्ग नष्ट करून किंमत चुकवावी लागली आहे. याचा परिणाम म्हणून जागतिक तापमानवाढ आणखी जोमाने होणार यात शंकाच नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required