रिक्षाचे रुपांतर स्कॉर्पिओ मध्ये...वाचा पुढे काय झाले !!!

रिक्षाचे रुपांतर तेही थेट ‘स्कॉर्पिओ एसयुवी (SUV)’ मध्ये ? ऐकायला वेगळं वाटतं ना ? पण हे खरंय भौ !!!

आयडिया पाहिजे, मग आपण काय पण करू शकतो. आता हेच बघा. सुनील या केरळ मधल्या एका साध्या ऑटोरिक्षा चालकाने रिक्षाचं रुपांतर एका स्कॉर्पिओ एसयुवी मध्ये केलय आणि हे रुपांतर एवढं परफेक्ट झालंय की स्कॉर्पिओ आणि रिक्षामधला फरकच समजणार नाही.

हाय कि नाय हटके राव ?

झालं असं की, या रिक्षाचा एक फोटो अनिल पनीकर यांनी ट्विटरवर टाकला आणि त्यात आनंद महिंद्र यांना टॅग केलं. आता असली भन्नाट आयडिया कोणाला नाही आवडणार. आनंद महिंद्र तर फिदाच झाले. त्यांनी पनीकर यांना ट्विट केलं की “मला ही रिक्षा ‘महिंद्र म्युझियम’ साठी विकत घ्यायला आवडेल. त्या बदल्यात मी चार चाकी वाहन द्यायला तयार आहे.”

दोन महिन्यांनी जेव्हा आनंद महिंद्र पन्नीकर यांच्या मार्फत सुनीलपर्यंत पोहोचले तेव्हा त्यांनी आपला शब्द पूर्ण करत रिक्षाच्या बदल्यात सुनीलला ‘महिंद्र सुप्रो मिनी व्हॅन’ दिली. यावेळचा एक फोटो देखील ट्विटरवर त्यांनी शेअर केला.

 

सबस्क्राईब करा

* indicates required