computer

स्नॅपचॅटला टक्कर देण्यासाठी इन्स्टाग्रामने आणलंय ‘थ्रीड’...पण हे थ्रीड आहे तरी काय ?

फेसबुक आणि whatsapp प्रचंड प्रसिद्ध असलं तरी इन्स्टाग्रामने आपली पब्लिक सांभाळून ठेवलेली आहे. असेही काही लोक आहेत ज्यांचं फेसबुकवर अकाऊंट नाही, पण इन्स्टाग्रामवर ते पडीक असतात.

तर, आता बातमी अशी आहे की इन्स्टाग्रामने आपल्या युझर्ससाठी नवीन अॅप आणलंय. या अॅपचं नाव आहे ‘थ्रीड’. इन्स्टाग्रामच्या युझर्सना मेसेजिंग सोप्पं जावं म्हणून हे अॅप तयार करण्यात आलंय. हा पाहा थ्रीडचा लोगो.

थ्रीड बघून तुम्हाला स्नॅपचॅट नक्कीच आठवेल. खरं तर स्नॅपचॅटला टक्कर देण्यासाठीच थ्रीड अॅप बनवण्यात आलंय. थ्रीडची घोषणा झाल्यापासून स्नॅपचॅटचे शेअर्स पण पडलेत.

थ्रीड काम कसं करतं ?

इन्स्टाग्रामवर मेसेजिंगची सुविधा आहे, पण तिथे कोणीही तुम्हाला मेसेज करू शकतो. थ्रीडवर मात्र तुमच्या जवळच्या मित्रांनाच प्रवेश मिळेल. तुम्ही आपल्या जवळच्या मित्रांशी आपलं करंट लोकेशन आणि बॅटरी स्टेटस शेअर करू शकता, तसेच स्टेटस अपलोड करू शकता. फक्त जवळचे मित्रच त्यात असल्याने तुम्हाला तुमच्या खाजगी गोष्टी शेअर करता येतील.

थ्रीड मध्ये ऑटो स्टेटस फिचर आहे, या फिचरमुळे अॅप स्वतःहून तुमचं लोकेशन आणि बॅटरी स्टेटस मित्रांशी शेअर करेल.

मंडळी, फेसबुकने म्हटलंय की फेसबुकवर जसं तुमच्या लोकेशनचा वापर करून तुम्हाला जाहिराती दाखवल्या जातात तसं या अॅपच्या लोकेशनचा वापर होणार नाही. फेसबुकने हे स्पष्ट केलं असलं तरी तुमचा डेटा फेसबुककडे जमा होणार हे नक्की.

तर मंडळी, स्नॅपचॅट की थ्रीड ? तुम्ही कोणाला निवडल ?

सबस्क्राईब करा

* indicates required