computer

आयटीबीपीच्या जवानांना सलाम ठोकणाऱ्या लहानग्याचा असा झाला सत्कार !!

देशभक्ती ही गोष्ट शिकवावी लागत नाही असे म्हटले जाते. हे किती खरे आहे हे सिद्ध करणारी एक घटना ऑक्टोबर महिन्यात घडली होती. लडाखमधला एक लहान मुलगा आयटीबीपीचे काही सैनिक परेड करत असताना त्यांना बघून सॅल्युट करत आहे, असा व्हिडीओ व्हायरल झाला होता. वास्तविक त्या लहान मुलाला कुणी सलाम करायला सांगितले नव्हते, पण स्वतःहूनच देशाच्या रक्षणासाठी स्वतःचे प्राण द्यायला तयार असणाऱ्या सैनिकांना बघून एक कडक सलाम ठोकत होता. 

त्या मुलाचे नाव होते नवांग नामग्याल! त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशातून त्याचां कौतुक झालं. त्याला सॅल्यूट बॉय म्हणून सगळे ओळखू लागले. आज एवढ्या दिवसानंतर त्याची आठवण काढण्याचं कारण असं आहे की नुकताच या मुलाचा अफलातून पद्धतीने सत्कार करण्यात आला आहे. ज्युनियर केजीत शिकणाऱ्या नवांगला पॅरा मिलिटरी फोर्सकडून नवा कोरा आयटीबीपीचा युनिफॉर्म देण्यात आला आहे.

त्याचा युनिफॉर्म घातलेला कॅम्पमधील व्हिडीओ 'happy and inspiring again!' हे कॅप्शन देऊन ट्विटरवर पोस्ट करण्यात आला. ट्विटरवर पोस्ट केल्याबरोबर काहीच तासात नवांग पुन्हा एकदा पूर्ण देशाच्या कौतुकाचा विषय ठरला आहे. त्याच्या छोट्या हातांनी तो व्हिडीओमध्ये जमेल तसं सॅल्यूट करत होता, पण आता त्याला सैन्यातल्या प्रथेप्रमाणे अगदी अचूक सॅल्यूट करता येतोय.  

लडाखसारख्या भागातल्या या मुलांना नेहमी आपल्या आजूबाजूला सैन्य दिसत असते. आपले रक्षण करणारे हे सैनिक कोणीतरी महान आहेत, ही जाणीव त्या लहान मुलात असणे ही खरोखर कौतुकास्पद बाब आहे. सैन्याकडून देखील त्याचं  कौतुक होणे हे अभिमानास्पद गोष्ट आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required