computer

जपानी अब्जाधीशाचा सामाजिक प्रयोग लोकांना कोट्यावधी बनवतोय !!

युसाकू मेझवा हा जपानचा व्यावसायिक आहे. त्याची संपत्ती ही जवळजवळ २०० कोटी डॉलर्स एवढी आहे. बातमी अशी की एका सामाजिक प्रयोगासाठी तो जवळजवळ ६४.३९ कोटी रुपये आपल्या फॉलोअर्सना वाटणार आहे. हा प्रयोग नक्की काय आहे ? चला जाणून घेऊ.

युसाकूने १ जानेवारी रोजी एक ट्विट केलं होतं. हे ट्विट री-ट्विट करणाऱ्या १००० फॉलोअर्सना तो या प्रयोगासाठी निवडणार आहे. हे १००० लोक कोणताही एक नियम लावून निवडण्यात येणार नाहीत.

काय आहे हा सामाजिक प्रयोग ?

या १००० लोकांना १ वर्षापर्यंत दर महिन्याला पैसे दिले जातील. दिलेले पैसे कसे खर्च करावेत यासाठी कोणतेही नियम नाहीत. अट एवढीच की नियमितपणे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची. या प्रयोगातून युसाकू याला बघायचं आहे की पैशांमुळे माणसाच्या आयुष्यात किती आनंद येतो. तसेच अचानक मिळालेल्या पैशांचा लोकांवर कसा परिणाम होतो. पैसे मिळाल्यावर त्यांनी त्याचं काय केलं आणि त्यांच्यात काय बदल झाला हे याचं प्रयोगातून निरीक्षण करण्यात येणार आहे.

हा एक गंभीर प्रयोग असल्याचं त्याने म्हटलं आहे. आणखी माहितीसाठी हा व्हिडीओ पाहा. व्हिडीओ मध्ये युसाकू जपानी बोलत आहे. त्याचं बोलणं समजून घेण्यासाठी खालचे सबटायटल्स वाचा.

युसाकूने जानेवारी २०१९ साली पण असाच प्रयोग केला होता. त्याची इच्छा आहे की यावेळच्या प्रयोगातून जे निष्कर्ष निघतील त्याचं अर्थतज्ञांनी आणि अभ्यासकांनी विश्लेषण करावं.