तरुणांना वेड लावणारी जपानी ललना चक्क ५० वर्षांची पुरुष निघाली? काय घडलंय नेमकं?

सध्या फिल्टर्सचा जमाना आहे. ऑनलाईन फिल्टर्स वापरून कुणीही आपलं रूप बदलू शकतं. जोडीला फोटो एडिटिंगचे ऍप किलो किलोने सापडतात. याच कारणाने ऑनलाईन दिसणाऱ्या चेहऱ्यांना प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय भावनिक निर्णय घेऊ नये.
याचा प्रत्यक्ष आणि चांगलाच विचित्र अनुभव जपानच्या लोकांना आला आहे. एक अतिशय सुंदर अशी मुलगी सतत सोशल मीडियावर बाईकसोबतचे फोटो अपलोड करत असे. एवढी सुंदर मुलगी म्हटल्यावर लोकांनी तिच्या प्रोफाइलवर उड्या टाकायला सुरुवात केली.
पण काही लोकांना एकदा एका फोटोत थोडी विचित्र गोष्ट जाणवली. मग त्यांनी या सुंदर ललनेचा शोध घ्यायचे ठरवले. त्यातल्या काहींना त्यात यश मिळाले. समोर आलेले चित्र मात्र चांगलेच धक्कादायक होते. एवढे दिवस लोकांना वेडे करणारी ही मुलगी चक्क 50 वर्षांचा माणूस निघाली!!!
みなさーん٩( ˆoˆ )۶
— 宗谷の蒼氷 (@azusagakuyuki) February 10, 2021
おバイクしてますかぁ
もうすぐ春ですよ
年齢:昭和の
身長:166
住み:イバラキ
大好き:バイクいじり
一言: Life is once, play this world#バイク乗りと繋がりたい #バイク乗りとして軽く自己紹介 pic.twitter.com/t28mZmJ4vg
साहजिक जो गहजब व्हायचा तो झाला. आपल्याला कुणी बघत नव्हते, मुलीच्या रुपात फोटो टाकल्यावर लोक गोळा व्हायला लागले, ही गोष्ट आपल्याला आवडल्याने आपण सातत्याने लोकांना हा वेडे बनविण्याचा धंदा सुरू ठेवला, अशी कबुली या 50 वर्षीय काकांनी आता दिली आहे.
आता त्या काकांचा भांडा फुटल्याने या सर्व गोष्टींपासून वाचण्यासाठी सजग राहणे गरजेचे आहे हे पुन्हा समोर आले आहे. पण सोशल मिडीयावर सुंदर मुलीचे फोटो बघून प्रेमात पडलेल्यांची भावना मात्र 'अच्छा सीला दिया तुने मेरे प्यार का' झाली असेल हे मात्र नक्की.