computer

अमेझॉनचे मालक आप्तेष्टांना घेऊन अंतराळात जाऊन आलेत? काय घडलं या प्रवासात?

अंतराळ प्रवासाच्या दिशेने मैलाचा दगड ठरू शकणारा अमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांचा अंतराळ दौरा यशस्वी झाला आहे. बेझोस आपल्या चार साथीदाऱ्यांसह काल म्हणजे २० जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी आकाशाच्या दिशेने झेपावले होते. ६ वाजून ५२ मिनिटांनी ते सुखरूप परतले आहेत.

बेझोस आणि टीमला या काळात शून्य गुरुत्वाकर्षणाचा अनुभव आला. त्यांची कंपनी ब्लु ओरिजिनकडून न्यूशेफर्ड यान मधून ते अवकाशात झेपावले होते. हे यान पृथ्वीपासून १०० किलोमीटरवर  जाऊन ११ मिनिटांनी परतले आहे. या माध्यमातून भविष्यात अंतराळ पर्यटनाच्या दृष्टीने मोठे पाऊल पडले आहे असे म्हणता येईल. 

१९६१ साली अंतराळात गेलेल्या एलन शेफर्ड यांच नाव या यानाला देण्यात आले आहे. बेझोस आपल्या या दौऱ्यावर आपले बंधू मार्क, ८२ वर्षीय माजी पायलट वॅली फंक आणि १८ वर्षीय ओलिव्हर यांना घेऊन गेले होते. विशेष म्हणजे गेल्या १५ दिवसात हा दुसरा अवकाश दौरे झालेला आहे. याआधी ब्रिटनचे उद्योगपती रिचर्ड ब्रेन्सन यांनी देखील अशीच यशस्वी मोहीम केली होती. 

या अंतराळ दौऱ्याच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे हे यान कुठलाही पायलट चालवत नव्हता. जमिनीवरूनच यान कंट्रोल केले जात होते. यानात ६ लोकांची बसण्याची व्यवस्था होती. पण खरे तर मोहिमेवर ४ लोक गेलं होते. या यानात सर्व प्रवाशांना पृथ्वीवरील दृश्य चांगल्या पद्धतीने पाहता यावेत यासाठी खिडक्या लावण्यात आल्या होत्या. 

हा प्रवास यशस्वी झाल्यावर आता अंतराळ प्रवास नजिकच्या काळात इतर लोकांसाठी सुद्धा खुला होऊ शकतो, याचा प्रत्यय या दौऱ्याच्या निमित्ताने आला आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required