८४ वर्षांच्या या लेकमॅनचा कर्नाटक सरकारने कसा गौरव केलाय? या माणसाचं कार्य काय आहे?

एका ध्येयाप्रति स्वतःचे जीवन समर्पित केलेले अनेक लोक आपल्याला माहीत असतात. आपल्या कार्याची कोणी दखल घ्यावी हा स्वार्थी हेतू त्यांचा कधीच नसतो. पण एक समाज म्हणून त्यांचा गौरव व्हायला हवा, तरीही त्यांचा म्हणावा तसा गौरव होताना दिसत नाही. पण कर्नाटक राज्य परिवहन मंडळाने या समजाला थोडा का होईना पण छेद दिला आहे.
कर्नाटकात 84 वर्षीय कामेगौडा तलावमॅन म्हणून ओळखले जातात. नावात तलाव आहे म्हणजे त्यांच काम सुद्धा तलावांसंबंधी असेल हे तुम्हाला समजले असेलच. कामेगौडा यांनी आपल्या भागातील एकही प्राणी, पक्षी तहानेने व्याकुळ होऊ नये यासाठी तब्बल 16 तलाव एकट्याने बांधलेले आहेत. त्याच कार्याचा गौरव म्हणून कर्नाटक राज्य परिवहन मंडळाने त्यांना आयुष्यभरासाठी फ्री बस पास दिला आहे.
डोंगर दऱ्यांवरील पाणी वाहून जाते आणि नेमका गरज असलेल्यांना ते पाणी मिळत नाही. म्हणून कामेगौडा कित्येक वर्षांपासून एकटेच तलाव बांधण्याचे कार्य करत असतात. त्यांच्या कार्याचा उल्लेख स्वतः प्रधानमंत्र्यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात केला होता. वास्तविक स्वतः प्रधानमंत्र्यांनी दखल घेणे हीच खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाची पावती आहे.
पुढील काळात त्यांना कर्नाटक परिवहन मंडळाकडून चालवल्या जाणाऱ्या सर्व बसेस मधून मोफत प्रवास करता येणार आहे.