देशभक्त चोराने सैनिकाच्या घरात शिरताच काय केलं पाहा!!

आज आम्ही एका देशभक्त चोराची गोष्ट सांगणार आहोत. हा देशभक्त चोर चोरी करण्यासाठी एका सैनिकाच्या घरात घुसला होता. त्याला जेव्हा समजलं की हे घर एका सैनिकाचं आहे तेव्हा त्याच्यातला देशभक्त जागा झाला. त्याने भिंतीवर आपला माफीनामा लिहून काढला. नेमकं काय घडलं वाचूया.
गोष्ट कोचीच्या थिरूवन्कुलूम भागातली आहे. बुधवारी या भागातल्या एका घरात चोर शिरला होता. घरात कपाटात त्याला सैन्याधिकाऱ्याची टोपी आणि गणवेश दिसला. त्याला समजलं की आपण एका सैनिकाच्या घरात शिरलो आहोत. मुळात देशभक्त असल्याने त्याला वाईट वाटलं.
पण म्हणून त्याने चोरी केलीच नाही असं नाही. त्याने १५०० रुपये आणि सैन्यात मिळणारी दारू लंपास केली आहे. आपल्या कृत्याची माफी मागण्यासाठी त्याने भिंतीवर माफीनामा लिहिला. तो म्हणतो की मी बायबलमधल्या सातव्या ईश्वरी आज्ञेचा भंग केला आहे. मला जर आधी माहित असतं की हे घर सैनिकाचं आहे तर मी इथे कधीच आलो नसतो’
तो चोर इथेच थांबला नाही तर त्याने कागदपत्रांनी भरलेली एक बॅग मागे ठेवली. त्याने लिहिलंय की कृपया ही बॅग त्याच्या मालकापर्यंत पोहोचवा. पोलिसांनी ही बॅग त्याच्या मालकापर्यंत पोहोचवली आहे, पण मालकाचं म्हणणं आहे की बॅगेत असलेले १०,००० चोराने पळवले आहेत.
तर, कोणाचं आहे हे घर? या सेनाधिकाऱ्याचं नाव समजलेलं नाही पण असं म्हणतात, की हा सेनाधिकारी आपल्या कुटुंबीयांसोबत २ महिन्यांपासून बहरीन येथे राहत आहे. घरात कोणी नाही बघून चोराने लोखंडी रॉडने दार फोडलं.
सैनिकाचं घर सुटलं असलं तरी त्या भागातील ४ घरं आणि दुकानं या चोराने फोडली आहेत. पोलिसांच्या मते आपली चोरी लपवण्यासाठी चोराने खोटी देशभक्ती दाखवली आहे.
तर मंडळी, काय असेल या चोराच्या मनात? तुम्हाला काय वाटतं?