computer

ब्लर्ब म्हणजे काय हे समजून घ्या आणि वाचा 'शाळा'चा ब्लर्ब !

ब्लर्ब ! ब्लर्बला मराठीत वेगळा असा शब्द नाही. पुस्तकाच्या मलपृष्ठावर म्हणजे मागच्या कव्हरवर पुस्तकाची झलक दाखवणारं - थोडक्या शब्दात हे पुस्तक काय आहे याची ओळख लिहिलेली असते. त्याला ब्लर्ब म्हणतात. १९०७ साली जिलेट बर्जेस नावाच्या विनोदी लेखकाने हा शब्द पहिल्यांदा वापरात आणला. त्यानंतर ब्लर्ब सगळ्याच पुस्तकांवर छापला जायला लागला.तुम्ही नियमित पुस्तकांची खरेदी करणारे असाल तर एखादे नवे पुस्तक विक्रीस ठेवलेले बघितल्यावर तुमचा खरेदीचा निर्णय बर्‍याचवेळा'ब्लर्ब'वर अवलंबून असतो.आमची बोभाटाची टीम म्हणजे वाचकांची टीम आहे. त्यांच्या सूचनेवरून आजपासून निवडक ब्लर्ब आम्ही इथे प्रकाशित करणार आहोत. सुरुवात मिलिंद बोकील यांच्या ' शाळा' या पुस्तकाच्या ब्लर्बने करत आहोत. 
बघा, हा प्रयोग तुम्हाला आवडतो का ? 
टीम बोभाटा-ब्लर्ब

त्या दिवशी मला कळलं की

शाळेची मजा कशात आहे ते.

वर्ग आहेत, बाकं आहेत,

पोरंपोरी आहेत, सर आहेत,

गणित आहे, भूगोल आहे,

नागरिकशास्त्रसुध्दा; पण

आपण त्यात कशातच नाही.

आपण त्या गाईंच्या पाठीवर

बसणार्‍या पांढर्‍या

पक्षासारखे मुक्त आहोत.

ह्यांच्या शाळेत बसलेलो

असलो तरी आपल्या मनात

एक वेगळीच शाळा भरते.

खास एकट्याचीच.

त्या शाळेला वर्ग नाहीत,

भिंती नाहीत, फळा नाही,

शिक्षक नाहीत;

पण त्यातलं शिकणं

फार सुंदर आहे.

शाळा- लेखक मिलिंद बोकील
प्रकाशक - मौज प्रकाशन गृह
ISBN: 9788174869098, 9788174869098

सबस्क्राईब करा

* indicates required