कोल्हापुरात लागलं आगळंवेगळं लग्न
लोकांना आजवर वेगवेगळ्या प्रकारची लग्नं करताना पाह्यलं आणि ऐकलं असेल. पाण्यात, हवेत, विमानात आणि कुठे-कुठे लग्नं झाल्याच्या बातम्या आपण पाह्यल्याच असतील. पण आज कोल्हापुरात चक्क रोप-वेच्या तारांना लटकून लग्न पार पडलं.
पावन खिंडीतल्या जखिणीचा/जखलाईचा कडा येथे हा समारंभ पार पडला. या ठिकाणी सुमारे हजार फूट खोल दरी आहे. त्या दरीवर तारा बांधून रोपवे तयार करण्यात आला होता. वर-वधू आणि आंतरपाटासोबत भटजीपण या लग्नात रोपवेला लटकले होते. कोल्हापूरचे गिर्यारोहक जयदीप जाधव आणि पाडळीच्या रेश्मा पाटील हे या वर-वधूंनी गिर्यारोहणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि संसाराची थरारक सुरूवात करण्यासाठी अशा अभिनव पद्धतीने लग्न केल्याचं मिडियाशी बोलताना सांगितलंय.




