computer

कोल्हापूरच्या रस्त्यावर हे काय लिहिलं आहे? व्हायरल फोटोंमागे काय गोष्ट आहे?

प्रेमासाठी चांद तारे तोडून आणण्याचा गोष्टी आता जुन्या झाल्या आहेत. आता प्रेमी प्रेम व्यक्त करण्यासाठी भन्नाट डोक्यालिटी लढवत आहेत. काही वर्षापूर्वी पुण्यात 'आय एम स्वारी शिवडे'चे बॅनर लागलेले सर्वांनी बघितले होते. आता कोल्हापुरात एका दिलजले आशिकने थेट अडीच किलोमीटरपर्यंतचे रस्ते रंगवले आहेत. त्याने फिल्मी स्टाईलने अडीच किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यांवर 'आय लव यु' आणि 'आय मिस यु' लिहून काढले आहे. तसेच भावाने पुढे 'जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी' असे रस्त्यांवर लिहून काढले. 

गुरुवारी जेव्हा शिरोळ तालुक्यातील धरणगुट्टी गावाजवळील लोक झोपेतून उठली तेव्हा त्यांनी पूर्ण रस्ता आय लव यु आणि आय मिस यु च्या मॅसेजेसनी भरलेला बघितला. हे काय प्रकरण आहे हा विचार करूनच लोकांना आश्चर्य वाटत होते. जयसिंगपूर पासून तर धरणगुट्टीपर्यंतचा अडीच किलोमीटरचा रस्ता या पठ्ठ्याने ऑइल पेंटने रंगवून ठेवला आहे. 

भावाने आपले प्रेम तर व्यक्त केले, पण ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना मात्र त्याने कामाला लावले. त्यांना हे सर्व लिहीलेले मेसेजेस बराच वेळ खोडत बसावे लागले आहेत. तो कोण होता हे समोर आलेले नसले तरी त्याने पूर्ण महाराष्ट्रात चर्चा केली हे मात्र खरं आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required