पोलिसदलात दाखल झालीय रोबो ?? काय काम करेल ती ??

चेन्नईच्या विमानतळावर स्वागत करणारा रोबोट, इंदूर मधला ट्राफिक सांभाळणारा रोबॉट, एवढंच काय जपान मध्ये अख्ख हॉटेल चालवणाऱ्या रोबॉट्सची फौज हे तर तुम्ही पाहिलं असेलच, पण आज आम्ही सांगणार आहोत भारताच्या पहिल्यावहिल्या पोलिस रोबॉट बद्दल. हा रोबॉट ‘तो’ नसून ‘ती’ आहे भाऊ.

स्रोत

गेल्या मंगळवारी केरळच्या तिरुअनंतपुरम पोलिस मुख्यालयात KP-BOT या रोबोकॉपचं स्वागत झालं. या महिला रोबोकॉपला उपनिरीक्षकाचं पद देण्यात आलं आहे. ती भारतातली पहिलीच महिला रोबोकॉप आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या रोबॉटचं पोलीस दलात नेमकं काम काय ? कारण पोलिस खातं हे माणसाच्या मेंदूवर चालतं.

तर त्याचं असं आहे, की तिला इतर पोलीस कर्मचाऱ्यांसारखं डेस्क जॉब देण्यात आला आहे. तिची पोस्टिंग पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर असेल. येणाऱ्या माणसांना योग्य मार्गदर्शन करण्याचं आणि त्यांना योग्य त्या विभागाकडे पाठवण्याचं काम तिच्याकडे असेल. तसेच तिच्यावर अधिकाऱ्यांच्या भेटीच्या वेळा निश्चित करणे, नवीन केस फाईल करणे, ओळखपत्र सादर करणे अशा इतर जबाबदाऱ्या असतील. KP-BOT चं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे ती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ओळखून सलाम करू शकते.

स्रोत

मंडळी, गेल्यावर्षी झालेल्या ‘ककून सायबर कॉन्फरन्स’चं फलित म्हणजे KP-BOT. केरळचं राज्य पोलीस सायबरड्रोम आणि कोचीच्या ‘Asimov’ या स्टार्टअप कंपनीने मिळून KP-BOT ची निर्मिती केली आहे. येणाऱ्या काळात KP-BOT मध्ये नवीन बदल करून तिला अधिकाधिक कार्यक्षम करण्यात येईल.

तर मंडळी, कशी वाटली ही रोबोकॉपची आयडिया ? अशा रोबोकॉपने पोलीस खातं जास्तीतजास्त चांगल्याप्रकारे काम करू शकतं असं तुम्हाला वाटतं का ? सांगा बरं !!

 

आणखी वाचा :

जपानमध्ये रोबोट चालवत आहेत एक पूर्ण हॉटेल..

कार्यकर्ते मंडळी, तयारीला लागा... निर्माण होतोय जगातला पहिलावहिला रोबोट राजकारणी

एका देशाचं नागरिकत्व मिळवणारी पहिली रोबो, पण AI म्हणजे काय ? जाणून घ्या तिची पूर्ण कहाणी..

जपानमध्ये लवकरच रोबॉट्स जेवण वाढतील...आणि पाहा यांना कामाला कोण लावणार आहे ते...

सबस्क्राईब करा

* indicates required