computer

२०२१ वर्षातल्या सुट्ट्यांची यादी....काय काय करणार याची तयारी आताच करून घ्या !!

२०२० हे वर्ष भीतीच्या छायेखालीच गेलं. पण आता जीवनमान हळूहळू पूर्वपदावर येत आहे. नवीन कॅलेंडर सर्वांच्या भिंतीवर लागलेच असेल. रुटीन बदल म्हणून कुठे जायचा प्लॅन करत असाल तर २०२१ हे वर्ष नक्कीच चांगले असेल अशी आशा करूया.

लांब कुठे जायला जोडून सुट्ट्या आल्या तर सोपे होऊन जाते. कारण सुट्टीत कोणी गावी जातात किंवा अनेकजण दरवर्षी एकदातरी कुलदेवतेचे दर्शन घ्यायला जातात.असे कितीतरी प्रसंग असतात ज्यासाठी मोठी सुट्टी गरजेची असते. अगदी काही नाही तरी कंटाळवाण्या रुटीन मधून आराम करणेही महत्वाचे असते.

या लेखात प्रत्येक महिन्यांत असलेल्या सुट्ट्यांची यादीच देत आहोत. ज्यांना शनिवार रविवार सुट्टी आहे ते जोडून तुम्ही कुठेही जायचे किंवा कुठलाही कार्यक्रम प्लॅन करू शकता. त्यासाठी आगाऊ बुकिंगही लगेच करू शकता.

(बोभाटाच्या या लेखाचा उद्देश २०२१ सालातील सुट्ट्यांची माहिती देणे एवढाच आहे. निर्बंध असतानाही घराबाहेर पडणे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणे याला प्रोत्साहन देण्याचा आमचा हेतू नाही. वाचकांनी नियमाचे पालन करत आपल्या सुट्ट्यांचा आनंद घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे.)

जानेवारी २०२१

नवीन वर्षाचा दिवस - १ जानेवारी (शुक्रवार)

मकर संक्रांती - १४ जानेवारी( गुरुवार)

प्रजासत्ताक दिन - २६ जानेवारी(मंगळवार)

सलग ४ दिवसांच्या सुट्टीसाठी शुक्रवार किंवा सोमवारी सुट्टी घेऊ शकता.

फेब्रुवारी २०२१

१९ फेब्रुवारी - छत्रपती शिवाजी महाराज जयंती (शुक्रवार)

ही शासकीय सुट्टी आहे. शनिवार रविवार जोडून आल्यामुळे तीन दिवस सुट्टी मिळू शकते.

 

मार्च २०२१

महाशिवरात्री - ११ मार्च (गुरुवार)

होळी (धुलिवंदन)- २९ मार्च (सोमवार)

सलग ४ दिवसांच्या सुट्टीचे मार्चमध्ये दोन लॉंग विकेंड ठरवता येतील.

एप्रिल २०२१

गुड फ्रायडे - २ एप्रिल (शुक्रवार)

गुढीपाडवा- १३ एप्रिल(मंगळवार)

 

मे २०२१

कामगार दिन - १ मे  (शनिवार)

अक्षय तृतिया/रमजान ईद - १४ मे (शुक्रवार)

मे मध्ये मुलांना सुट्ट्या असतात. त्याप्रमाणे प्लॅन करू शकता. जून -जुलै मध्ये मोठा विकेंड येत नसल्यामुळे कामच काम असेल.

ऑगस्ट २०२१

स्वातंत्र्य दिन - १५ ऑगस्ट (रविवार)

पतेती- १६ ऑगस्ट (सोमवार)

माेहरम- १९ ऑगस्ट (गुरुवार)

जन्माष्टमी - ३१ ऑगस्ट (मंगळवार)

 

सप्टेंबर २०२१

गणेश चतुर्थी- १० सप्टेंबर (शुक्रवार)

अनंत चतुर्दशी- १९ सप्टेंबर (रविवार)

ऑक्टोबर २०२१

महात्मा गांधी जयंती - २ ऑक्टोबर(शनिवार)

दसरा - १५ ऑक्टोबर( शुक्रवार)

ईद-ए-मिलाद - १९ ऑक्टोबर(मंगळवार)

 

नोव्हेंबर २०२१

वर्षातला सगळ्यात महत्वाचा महिना, कारण वर्षाचा सर्वात मोठा सण दिवाळी त्यामुळे सुट्टी हवीच.

नरकचतुर्दशी- ४ नोव्हेंबर(गुरूवार)

वसुबारस- ५ नोव्हेंबर (शुक्रवार)

भाऊबीज  ६ नोव्हेंबर (शनिवार)

गुरुनानक जयंती - १९ नोव्हेंबर (शुक्रवार)

दिवाळीच्या सुट्ट्या अगदी विकेंडला धरून आल्या आहेत त्यामुळे २ दिवस सुट्टी टाकता आली तर जवळपास आठवडा मिळतोय.

डिसेंबर २०२१

ख्रिसमस - २५ डिसेंबर ( शनिवार)

 

आता सोपे होईल ना सुट्टीचे प्लॅंनिंग? ही यादी मित्रांसोबतही शेयर करायला विसरू नका.

 

लेखिका: शीतल अजय दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required