व्हिडिओ- अरे, ही एवढुशी चिमुरडी चक्क पोळ्या लाटतेय??

छान गोलाकार पोळ्या जमणं म्हणजे खायचं काम नाही. पण या व्हिडिओमधली मुलगी पाहा, चारेक वर्षांची असेल. पण पोळ्या लाटण्याचा तिची स्टाईल तर पाहा. हातात न मावणार्‍या लाटण्याने पोळी तर लाटतेच आहे, वर हातावर तोलून कुठे जाड-पातळ झाली का त्याचा अंदाजही घेते आहे.

हिची आई शेजारीच आहे. त्यामुळं हा सगळा खेळाचा प्रकार चालला असावा असं आपण मानून घेऊ. अर्थात या धिटुकलीने मात्र खेळ खूपच सिरियसली घेतलेला दिसतोय.

सबस्क्राईब करा

* indicates required