computer

पाण्याच्या बाटलीऐवजी चक्क पाण्याचे गोळे ? काय प्रकरण आहे हे ??

मंडळी, लंडनच्या मॅरेथॉन मध्ये एक हटके गोष्ट दिसून आली. स्पर्धकांना पिण्यासाठी चक्क पाण्याचे गोळे देण्यात आले होते. हा काय प्रकार असतो ते या फोटोत पाहा.

मंडळी, आता मॅरेथॉन म्हटलं की पाणी मोठ्याप्रमाणात लागणारच. अशावेळी साधारणपणे पाण्याच्या बाटल्या मागवल्या जातात. लंडन मॅरेथॉनसाठी तब्बल २ लाख बाटल्या लागणार होत्या. याचा अर्थ २ लाख बाटल्यांचा कचरा पण तयार झाला असता. म्हणून लंडन मॅरेथॉनच्या आयोजकांनी पाण्याच्या गोळ्यांची निवड केली.

आपण आपल्या मराठीत यांना पाण्याचे गोळे म्हणतो पण शास्त्रीय भाषेत यांना ‘वॉटर पॉड्स’ म्हटलं जातं. या वॉटर पॉड्सच्या बाहेरील आवरण हे एका खास समुद्री शेवाळापासून तयार केलेलं असतं. या आवरणाच्या आत पाणी असतं. आपण जेव्हा वॉटर पॉड तोंडात टाकतो तेव्हा वरचं आवरण विरघळून पाणी बाहेर पडतं.

मंडळी, हे समुद्री शेवाळ आरोग्यासाठी गुणकारी पण असतं आणि पर्यावरणात त्याचं सहज विघटनही होतं. अवघ्या काही आठवड्यात हे विघटन घडतं. प्लास्टिकचं विघटन व्हायला काही हजार वर्ष लागू शकतात. पुढील काळात वॉटर पॉड्समुळे प्लास्टिकचा खप मोठ्याप्रमाणात कमी होऊ शकतो.

हे उत्पादन ज्यांनी तयार केलं त्यांच्याबद्दल पण थोडक्यात जाणून घेऊया.

स्किपींग रॉक्स लॅॅब नावाच्या लंडनचा एका स्टार्टअप कंपनीने या वॉटर पॉड्सचं उत्पादन केलं होतं. त्याचं हे पाहिलंच उत्पादन आहे. त्यांनी या पहिल्यावहिल्या उत्पादनाला ‘Ooho seaweed water pouches’ असं नाव दिलंय.

मंडळी, तुम्हाला कशी वाटली ही भन्नाट आयडिया ?? आपल्याकडच्या मॅरेथॉन मध्ये हे वॉटर पॉड्स असायला हवेत असं कोणाकोणाला वाटतं ?

सबस्क्राईब करा

* indicates required