वाचा रोल्स रॉईसचा 'घंटा गाडी' म्हणून वापर करणाऱ्या महाराजांविषयी !!!

इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं. पण इंग्रजांच्याच काळात त्यांच्याच देशात जाऊन त्यांना धडा शिकवणारा एक महाराजा आपल्याही देशात होता, हे आपल्याला कदाचित तेवढंसं माहित नाही. त्या महाराजांचं नाव होतं महाराजा जयसिंह. त्यांची ओळख ‘महाराजा ऑफ अलवर’ (राजस्थानातील एक संस्थान) म्हणून होती. लंडनमध्ये घडलेल्या एका घटनेनंतर त्यांनी थेट इंग्रजांना आपला इंगाच दाखवला. मंडळी चला जाणून घेऊया काय घडलेलं त्यावेळी...

Related imageस्रोत

असं म्हणतात की एकदा बॉंड स्ट्रीट, लंडनमध्ये असताना महाराजा जयसिंह हे सामान्य वेशात कारची चौकशी करण्याकरिता  रोल्स रॉईसच्या शोरूम मध्ये गेले. त्यावेळी सामान्य कपड्यांत असल्यानं महाराजांना शोरूममधल्या लोकांनी ओळखलं नाही. एका साध्या भारतीयाला एवढ्या महागड्या शोरूम मध्ये बघून तिथल्या सेल्समननं म्हटलं की “तुम्हा कंगाल भारतीयांची एवढी महागडी कार घेण्याची लायकी नाही’.

शोरूम मधल्या घटनेनंतर ते आपल्या हॉटेलवर परतले आणि हॉटेल वरून त्याच शोरूम मध्ये फोन लावून सांगितले कि अलवरच्या महाराजांना काही कार विकत घ्यायच्या आहेत. एक राजा कार विकत घेणार म्हटल्यावर शोरूम मध्ये सगळे कामाला लागले. जेव्हा जयसिंह राजेशाही थाटात शोरूम मध्ये दाखल झाले तेव्हा त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरले होते आणि ज्यांनी त्यांचा अपमान केला होता ते त्यांच्यासमोर नतमस्तक उभे होते.

झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांनी त्या शोरूम मधल्या सर्वच्या सर्व सहा कार विकत घेतल्या आणि त्याच वेळी त्याची पूर्ण रक्कम चुकती करून भारतात परतले. मायदेशी आल्यानंतर त्यांनी स्थानीक नगरपालिकेला या सर्व सहा कार्सचा उपयोग कचऱ्याची गाडी म्हणून करण्याचा आदेश दिला. आणि काहीच दिवसात ती शाही कार अलवरच्या रस्त्यावरून कचरा उचलण्याचं काम करू लागली.

रोल्स रॉईस सारख्या नामी कंपनीची अशी  नाचक्की झाल्याची ही बातमी जगभरात  पसरली आणि बघता बघता रोल्स रॉईसची मागणी कमी होऊ लागली.  कारच्या विक्रीत मोठी कपात झाली आणि जगभरात हा एक हास्यास्पद विषय झाला.

हा सर्व प्रकार रोल्स रॉईसच्या मालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःहून जयसिंहांची ‘लिखित’ स्वरुपात माफी मागितली आणि कारचा उपयोग घंटा गाडी म्हणून न करण्याबाबत विनवणी केली आणि त्याच बरोबर आणखी सहा कार मोफत देऊ केल्या.

शिकवायचा होता तो धडा शिकवल्यानंतर महाराजांनी हा प्रकार थांबवला.

 

(महाराजा भूपिंदर सिंह यांच्याबद्दलही अशीच कहाणी सांगितली जाते)

सबस्क्राईब करा

* indicates required