आज हॅरी पॉटर झाला २० वर्षांचा! बघा फेसबुकवरची धम्माल!!!

बरोबर आजच्याच दिवशी ‘हॅरी पॉटर अँड दि फिलॉसोफर्स स्टोन’ हे हॅरी पॉटर सिरीज मधलं पाहिलं पुस्तक वाचकांच्या पुढ्यात पडलं आणि प्रचंड गाजलं. ती तारीख होती २६ जून १९९७. मंडळी या घटनेला आज २० वर्ष पूर्ण होत आहेत. आजही हॅरी पॉटर ९० च्या दशकातील मुलांपासून ते सध्याच्या पिढीपर्यंत सर्वांना तितकाच जवळचा वाटतो.

हॅरी पॉटरच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी फेसबुकने अनोखी शक्कल लढवली आहे. फेसबुकने एक असं फिचर आणलाय ज्यामुळे आपण 'Harry Potter', 'Gryffindor', 'Ravenclaw', 'Hufflepuff', किंवा 'Slytherin' यापैकी काहीही फेसबुकवर लिहू आणि त्यावर जेव्हा क्लिक करू तेव्हा एक जादूची छडी प्रकट होऊन संपूर्ण स्क्रीन वर जादू पसरवते. आहे कि नाही गम्मत.

याचा प्रात्यक्षिक म्हणून आम्ही तुम्हाला व्हिडीओ क्लिप पाठवत आहोत मंडळी. तर स्वतः ट्राय करा आणि जादू बघा.

(या फिचरसाठी तुमचं फेसबुक अॅॅप अपडेट केलेलं असायची गरज आहे)

सबस्क्राईब करा

* indicates required