स्वदेशी चळवळीच्या तीन कथा भाग २ : टाटा स्टील आणि स्वदेशी

मागच्या भागात आपण पैसा ग्लास वर्क्स बद्दल वाचलं. आता या भागात बघूया टाटा स्टील स्वदेशी चळवळीतून कशी उभी राहिली..
टाटा स्टील
१९०५-०६ सालातली ही गोष्ट आहे . टाटा स्टील कंपनी उदयास येत होती. टाटानी ४० लाख स्वत:च्या खिशातून खर्च करून स्टील उत्पादन भारतात सुरु करण्याचे ठरवलं होतं. वानवा होती ती फक्त भांडवलाची!! भांडवल मिळणार कुठे? तर फक्त युरोपात. त्यासाठी टाटा मंडळी लंडनला चार महिने तळ ठोकून बसली होती.
पण.. भारतात असा प्लांट यशस्वी होईल यावर कुणाचाही विश्वास नव्हता. काही दिवसानी सर्वजण हात हलवत भारतात परतले. पर्याय एकच होता, तो म्हणजे कारखाना उभा करण्याचे मनसुबे गुंडाळून ठेवण्याचा!
टाटा स्टील कंपनीचा पहिला पब्लिक इश्यू शेअर बाजारात येणार होता पण या इश्यूला यश मिळणार नाही हे स्पष्टच होते.
एक दिवशी टाटाना एक पारशी नातेवाईक भेटायला आले होते. ते जाता जाता म्हणाले की शेअर विकायचे असतील तर तुमची कंपनी स्वदेशी आहे असा प्रचार करा आणि बघा कसे हातोहात शेअर विकले जातील. टाटांनी नेमके तेच केले. टाटा स्टील ही स्वदेशी कंपनी आहे प्रचार केला आणि चमत्कार झाला. बॉम्बे हाऊसच्या समोर लोकांनी रात्रंदिवस रांग लावून टाटा स्टीलच्या शेअर साठी पैसे भरले. आणि इश्यू ओवर सबस्क्राराईब झाला. नव्या टाटा उद्योग समूहाची अप्रत्यक्ष मुहूर्तमेढ रोवली गेली ती टिळकांच्या स्वदेशी मंत्राने !!
असा आहे मंडळी स्वदेशीचा महिमा!!