computer

पोलिसांनी कुत्रे आणले म्हणून हा पठ्ठ्या सिंहच घेऊन आला....व्हिडीओ पाहा !!

सध्या आंदोलनांचा सीझन आहे, जगभरातील वेगवेगळ्या देशांत काही ना काही कारणांसाठी आंदोलने सुरू आहेत. भारतातसुद्धा जेएनयूतल्या आंदोलनाने चांगलाच पेट घेतला आहे. त्यातल्या त्यात या सर्व आंदोलनांमध्ये असलेले साम्य म्हणजे ही आंदोलने आधीसारखी सरधोपट नाहीत. तरुण वर्ग या आंदोलनांत मोठ्या प्रमाणावर प्रयोग करत आहेत. 

हॉंगकॉंगमधल्या आंदोलनात ओळख कळू नये म्हणून लोकांनी मास्क घातले, तर जेएनयूत मानवी साखळी तयार करण्यात आली होती. पण हे सगळे चिल्लर वाटेल इतका भन्नाट प्रकार इराकमध्ये घडला आहे मंडळी!!!

सध्या इराकमध्येसुद्धा आंदोलन सुरू आहे, आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांकडून शिकाऊ कुत्र्यांचा वापर करण्यात येत आहे. तर याला उत्तर देण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी चक्क सिंह मैदानात उतरवला आहे!!  सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडीओत इराकचा झेंडा गुंडाळलेला आणि मोठ्या साखळीने बांधलेला हा सिंह मोठमोठ्या आरोळ्या ठोकत रस्त्याने चालताना दिसत होता. 

मंडळी इराकमध्ये सध्या गृहयुद्ध सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तेलाच्या पैशाने मालामाल झालेले राज्यकर्ते तरुणांना रोजगार देण्यात, तसेच इतर पायाभूत सुविधा देण्यात कमी पडत असल्याचे सांगत लोक रस्त्यावर उतरले आहेत.

 

लेखक : वैभव पाटील