computer

मारुती सुझुकी आणि टोयोटो यांच्या जुने पार्टस मिळवून देण्याच्या या प्रयोगाबद्दल तुम्हांला माहित आहे का?

मारुती सुझुकी आणि टोयोटो त्सुशो ग्रुपने मिळून एक नवीन प्रयोग हाती घेतला आहे. या दोन्ही कंपन्यांनी एकत्र येऊन ‘मारुती सुझुकी टोयोत्सु इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ (MSTI) हा संयुक्तउपक्रम स्थापन केलाय. या उपक्रमाच्या अंतर्गत भारतातल्या जुन्या गाड्यांचे भाग सुटे करण्यात येतील आणि त्यांचा पुनर्वापर होईल. हा प्रयोग या बड्या कंपन्यांमधील ५०%-५०% तत्त्वावर आधारित आहे.

MSTI चं मुख्यालय हे दिल्ली येथे असणार आहे तर पहिलं युनिट हे नोएडा येथे सुरु होईल. नोएडाच्या युनिटमध्ये महिन्याला २००० गाड्यांवर प्रक्रिया करण्याची क्षमता असणार आहे. हे काम करण्यासाठी प्रशिक्षित तज्ञ निवडण्यात येतील. जुन्या गाड्या मिळवण्यासाठी डीलर्स तसेच थेट ग्राहकांशी संपर्क करण्यात येणार आहे.

महत्त्वाचं म्हणजे हे करत असताना जो कचरा निघेल त्याचं जागतिक गुणवत्ता आणि पर्यावरण संरक्षण मानांकनाप्रामाणे ओला आणि सुका कचरा अशी विभागणी होणार आहे.

आपल्या जुन्या गाडीवर आपलं भलतंच प्रेम असतं, पण अशा गाड्यांची योग्य विल्हेवाट लावल्याने बरेच फायदे पण  होतात. पहिला फायदा म्हणजे गाडीने व्यापलेली जागा रिकामी होईल. जुन्या गाड्या वापरताना सुरक्षेचा प्रश्न असतो तोही मिटेल. प्रदूषण कमी होईल. याखेरीज सुट्या भागांना नव्याने वापरता येईल.

तर, तुमच्याकडे जर १५ वर्षांपेक्षा जुनी गाडी असेल तर ती गाडी MSTI कडे सोपवण्याचा नक्कीच विचार करा.

सबस्क्राईब करा

* indicates required