माटुंगा स्टेशनची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद: नक्की काय घडलंय तिथे??

माटुंगा स्टेशनचं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे. याचं निमित्त ठरल्या आहेत या स्टेशनवर काम करणाऱ्या महिला. माटुंगा हे देशातील पहिलं रेल्वे स्थानक आहे, जिथे फक्त महिला कर्माचारी काम करत आहेत. आणि हे गेल्या ६ महिन्यांपासून चालू आहे बरं का. तिकीट देण्यापासून ते तिकीट तपासण्यापर्यंतची सर्व कामं महिलांच्या हातात आहे ब्वा. 

जुलै २०१७ पासून माटुंगा स्थानकावर ३४ महिलांचा कर्मचारी वर्ग नेमण्यात आला होता. यात ११ तिकीट बुकिंग क्लर्क, २ मुख्य बुकिंग पर्यवेक्षक, ७ तिकीट कलेक्टर, ५ आरपीएफ महिला अधिकारी, २ उद्घोषणा करणाऱ्यया महिला आणि अन्य ५ कर्मचारी महिलांचा समावेश आहे. 

६ महिन्यांपूर्वी सर्व कारभार महिलांवर सोपवल्यानंतर आजतागायत त्यांच्या कामाबद्दल सकारात्मक प्रतिसाद मिळत आहेत. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक मोठं पाऊल उचललं गेलं आहे आणि लिम्का बुकमध्ये नाव कोरलं गेल्यानंतर त्याची एक प्रकारे पोचपावतीच मिळाली आहे.  

एकंदरीत माटुंगा स्टेशनवर खऱ्या अर्थाने नारीशक्ती दिसून येत आहे.

 

आणखी वाचा :

गिनीज बुक आणि लिमका बुक...जाणून घ्या विश्वविक्रमांच्या या दोन पुस्तकांमधला फरक !!

सबस्क्राईब करा

* indicates required