या राजकुमारीने लग्नाला नकार दिला म्हणून १३ पुरुषांनी आत्महत्या केली...कोण आहे ही राजकुमारी ?

मंडळी खूप पूर्वीपासून एक फोटो सोशल मिडियावर सतत फिरतोय. इराणची कजार राजवंशातली ‘राजकुमारी कजार’ ही इराणमधली त्याकाळातील सौंदर्याचं प्रतिक समजली जायची. तिने तब्बल १३ मुलांना लग्नासाठी नकार दिला आणि त्या सर्व १३ पुरुषांनी आत्महत्या केली. राव, त्या सुंदर राजकन्येचा फोटो बघून तर ह्या १३ जणांचा मेंदू ताळ्यावर  होता ना? असा प्रश्न पडतो.

आता तिने खरंच १३ जणांना नाही म्हटलेलं का? मुळात तिला  १३ जणांनी विचारलं होतं का? ह्या प्रश्नाचा मागोवा घेत असताना कजार राजकुमारीबद्दल आमच्या हाती काही माहिती लागली. ती अशी :

१. राजकुमारी कजारचं पूर्ण नाव होतं ‘झहरा खानुम ताजए-सल्तनत’ (१८८३-१९३६). ती नासेर अल-दिन शाह’ या कजार बादशहाची मुलगी होती. या बादशहाच्या 'हरम' मध्ये अनेक स्त्रिया होत्या.


स्रोत

२. तिचं लग्न ‘आमीर हुसेन खान’ या माणसाशी झालं होतं. त्यांना २ मुले आणि २ मुली होत्या. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिने आणखी २ लग्नं केली.

स्रोत

३. असं म्हणतात की इराणचा प्रसिद्ध कवी ‘आरेफ गझविनी’ हा कजारच्या प्रेमात पडला होता. त्याने ‘ए ताज’ नावाची कविता तिला समर्पित केली होती.

स्रोत

४. कजार ही एक स्त्रीवादी राजकुमारी होती. इराणमधल्या स्त्रियांच्या हक्कांबद्दल तिने लढा दिला. १९१० साली स्त्री स्वातंत्र्यासाठी तिने भूमिगत गट तयार केला होता.


स्रोत

५.  ‘हिजाब’ काढून पाश्चिमात्य पेहराव करण्यास सुरुवात करणारी ती पहिली महिला होती. लेखन, चित्रकला आणि चळवळीत ती सक्रीय होती.


स्रोत

मंडळी या राजकुमारीबद्दल कितीही प्रवाद असले तरी वरील मुद्द्यांवरून तिच्या व्यक्तिमत्वाचा वेगळा भाग इथे दिसून येतो.

 

(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)

©बोभाटा

सबस्क्राईब करा

* indicates required