computer

इंजिन बंद पडल्यानंतरही २२६ प्रवाशांना सुखरूप वाचवणारा देवदूत वैमानिक !!

Subscribe to Bobhata

मंडळी, रशियाला त्यांचा नवीन हिरो सापडला आहे. ज्या घटनेतून हा सुपरहिरो सापडला ती घटना वाचून तुम्हालाही तो कोणत्याही देवदुतापेक्षा कमी वाटणार नाही.

उरल एअरलाईन्सचं एअरबस A321 विमान मॉस्कोच्या झुकोव्हस्की विमानतळावरून सिम्फेरोपोल विमानतळाच्या दिशेने प्रवास करत होतं. विमानात २२६ प्रवासी आणि ७ कर्मचारी होते.

विमानाने झेप घेतल्यानंतर थोड्याच वेळात विमानाच्या समोरून पक्षांचा थवा आला. पक्षांचा वेग इतका जबरदस्त होता की विमानाच्या दोन्ही इंजिन्समध्ये पक्षी अडकले. परिणामी हवेतच विमान बंद पडलं.

विमान आणि विमानातील लोक अशा मरणाच्या दारात असताना या घटनेतला हिरो म्हणजे विमानाचा पायलट ‘दामीर युसुपोव्ह’ पुढे सरसावला. त्याने आधी तर इंजिन पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आलं नाही. मग त्याने इमर्जन्सी लँडिंग करायचं ठरवलं. पण समस्या अशी होती की लँडिंग गिअर पण बंद पडले होते. त्याने अशा परिस्थितीतही आपलं संपूर्ण कसब पणाला लावून विमानाला मक्याच्या शेतात उतरवलं.

मंडळी, एक मोठी दुर्घटना टाळण्यात त्याला यश आलं. विमानातले सगळे प्रवासी सुखरूप विमानातून बाहेर पडले. २२६ पैकी २३ प्रवाशांना दुखापत झाली. यात ९ मुलांचा समावेश आहे. त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

मंडळी, एका हिरोला जो सन्मान दिला जातो तो सन्मान ‘दामीर युसुपोव्ह’ला दिला जाणार आहे. त्याच्यासाठी लवकरच पुरस्कार जाहीर होईल.

विमानाची ही नेहमीची समस्या आहे. पूर्वीच्या पंख्यांवर चालणाऱ्या विमानांना तर पक्षांचा मोठा धोका होता. त्यावेळी असे अपघात वेळोवेळी घडायचे. आजच्या इंजिन असलेल्या विमानांच्या बाबतीतही हा धोका पूर्णपणे टळलेला नाही.

एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते. त्याकाळी पंख्याच्या विमानात केवळ पक्षी अडकायचे, पण आज इंजिनच्या विमानात माणसंही अडकतात. २०१५ साली मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज अंतराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाचा एक तंत्रज्ञ विमानाच्या इंजिनमध्ये ओढला गेला होता. याचं कारण होतं आजच्या इंजिनची प्रचंड शक्ती.

तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल ?

सबस्क्राईब करा

* indicates required