व्हिडीओ ऑफ दि डे : 'मिस वर्ल्ड बांगलादेश' स्पर्धेतील बाईंना H2O म्हणजे काय ते माहित नाय...पाहा कशी तारांबळ उडाली ते !!

Subscribe to Bobhata

राव, पोराटोराला विचारा की H2O म्हणजे काय तर ते डोकं खाजवत राहील. पन मिसवर्ल्डला तरी H2O म्हणजे काय ते माहित असावं की नाय ? बांगलादेशच्या ‘मिस वर्ल्ड बांगलादेश’ स्पर्धेत एका स्पर्धक बाईंना H2O म्हणजे काय विचारल्यावर त्यांना घाम फुटला नाव भाऊ.

रसायनशास्त्र लय म्हणजे लय कठीण असलही पन पाण्याचा फार्म्युला सगळ्यांना माहित असतोय की नाय ? सोप्पंय राव H2O म्हणजे पाणी !! आता हेच या स्पर्धक बाईंना विचारल्यावर त्या गोंधळल्या ना. त्यांनी तर असा आव आणला की आपल्याला ऐकूच आलं नाय. मग जज साहेबांनी परत प्रश्न विचारला. तरी पन ह्या ढिम्मच. शेवटी जज साहेबांना पोरीवर दया आली अन् त्यांनी उत्तर देऊन टाकलं.

जज साहेबांनी उत्तर सांगितल्यावर बाई म्हणाल्या, ‘ढाका मध्ये याच नावाचं हॉटेल आहे म्हणून मी कन्फ्युज झाले.’ आता बोला !!

बाईंचा गोंधळ कॅमेऱ्यात कैद झालाय भाऊ. मग काय, रातोरात व्हायरल झाला. चला आता व्हिडीओ पाहून घ्या !!

सबस्क्राईब करा

* indicates required