computer

या ठिकाणी सुरु झाले आहे देशातील पहिले मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र !!

सध्याच्या काळात मोबाईलशिवाय जगणं अशक्य आहे राव!! . मोबाईलमुळे सगळी कामे सोपी झाली आहेत राव!! मोबाईलमुळे अनेकांनी 'दुनिया मुठ्ठी में' करून घेतली आहे. पण मंडळी, अफलातून फायदे असणाऱ्या या मोबाईलमुळे नुकसान पण भयानक होत आहे राव!! दिवसेंदिवस मोबाईलचे व्यसन दारू किंवा ड्रग्सच्या नशेपेक्षा भयंकर बनत चालले आहे. हे मोबाईलचे व्यसन माणसाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही बाजूने कमकुवत करते. हे प्रमाण एवढे वाढले आहे की मोबाईलचे व्यसन दूर करण्यासाठी युपी सरकारने चक्क सरकारी दवाखान्यांमध्ये व्यसनमुक्ती केंद्र चालू केली आहेत. 

उत्तर प्रदेशच्या प्रयागराज म्हणजेच अलाहाबादला मोतीलाल नेहरू मंडलीय हॉस्पिटलमध्ये हे पहिले केंद्र उभारण्यात आले आहे. यासाठी पांच स्पेशालिस्ट डॉक्टर्स नेमण्यात आले आहेत. मोबाईलचे व्यसन खूपच वाढले आहे अशा रुग्णांवर या केंद्रातल्या स्पेशल माईंड चेंबरमध्ये उपचार करण्यात येईल. इथे त्यांचे समुपदेशन म्हणजेच काऊन्सिलिंग करण्यात येईल, तसेच त्यांच्यावर औधोपचारहीसुद्धा करण्यत येतील.  इथे मोबाईलचे व्यसन जडलेल्या रोग्यांचे पांच डॉक्टर्सकडून डोळे, मेंदू तसेच जनरल फिजिशियनकडून स्पेशल चेकअप करण्यात येईल. 

या व्यसनमुक्ती केंद्रात मोबाईलचे व्यसन तीन टप्प्यात सोडविण्यात येणार आहे. मंडळी, कदाचित देशातले हे पहिले मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र ठरू शकते. सध्या किमान उत्तर प्रदेशातले तरी हे निश्चित पहिले मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र आहे.  प्रयागराजच्या पहिल्या अशा केंद्रानंतर  हळूहळू पूर्ण उत्तर प्रदेशात अशी केंद्रे तुम्हाला जागोजागी दिसतील राव!! 

मंडळी, विडिओ गेम्समुळे अगदी लहान मुलांमध्येसुद्धा हिंसक वृत्ती जागृत व्हायला लागली आहे. पब्जीमुळे झालेले अनेक मृत्यु तर गेल्या काही काळात चर्चेचा विषय ठरले आहेत. अशा पार्श्वभूमीवर सरकारला हा मुद्दा गंभीर वाटायला लागला आहे हे चांगलेच आहे.

या कामासाठी स्पेशल हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात आला आहे. तीन टप्प्यांमध्ये करण्यात येणाऱ्या या उपचारात कुटुंबातील इतर सदस्यांचीसुध्दा मदत घेण्यात येणार आहे राव!! आतापर्यंत या सेंटरमध्ये काही केसेस आल्या आहेत. एका केसमध्ये तर चक्क दोन्ही भाऊ मोबाईलचे व्यसनी होते. दोघेच्या दोघे तब्बल १४-१४ तास मोबाईलवर पडून रहायचे. या सर्व घटनांमुळे अशा मोबाईल व्यसनमुक्ती केंद्राचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

मंडळी, उत्तर प्रदेशाने सुरुवात तर केली. पण महाराष्ट्रातसुद्धा अशा मोबाईल व्यसनमुक्ती केंद्राची नितांत गरज आहे. तुम्हांला काय वाटते??

सबस्क्राईब करा

* indicates required