⁠⁠⁠⁠⁠इडा पिडा घेऊन जा गे मारबत - खास नागपूरचा मारबत उत्सव!!

Subscribe to Bobhata

पोळ्याच्या -तान्ह्या पोळ्याच्या दिवशी साजरा करण्यात येणारा मारबत हा उत्सव ही (फक्त) नागपूरची जुनी परंपरा आहे. १८८५ सालच्या दरम्यान सुरु झालेल्या या मारबतचे आयोजन मुख्यत्वे नागपूरातील तेली आणि कोष्टी समाजातर्फे केले जाते. पण आता मारबत ही संपूर्ण नागपूरची सांस्कृतिक परंपरा झाली  आहे.

अर्थात उत्सव म्हटला की नृत्य-गायन हे पण त्यात आलेच. मारबत म्हणजे शहरावर येणार्‍या आपत्ती -संकटे येऊ  नयेत म्हणून साजरा करण्यात येणारा एक उत्सव. या उत्सवात दोन मारबत (मूर्ती) असतात. एक काळी तर दुसरी पिवळी. काळी मारबत दुष्ट अनिष्ट प्रवृत्तींची प्रतिक असते तर पिवळी सुष्ट आणि संरक्षण करणार्‍या शक्तीचे प्रतिक असते. मारबतीची मोठी मिरवणूक नागपूर शरातून निघते. काळ्या मारबतीचे दहन केले जाते. मिरवणूकीत "इडा पिडा घेऊन जा गे मारबत " अशा घोषणा केल्या जातात. या खेरीज समाजात असलेल्या दुष्ट आणि अनिष्ट प्रवृत्तींचे दर्शन 'बडग्या' च्या रुपात केले जाते.

स्रोत

जाणकारांच्या मते काळी मारबत ही पूतना मावशीचे प्रतिक आहे तर काही इतिहासकारांच्या मते काळी मारबत ही बांकाबाई भोसले ज्यांनी नागपूर ब्रिटीशांच्या स्वाधीन केले त्यांचे प्रतिक आहे. पण हा सगळा इतिहास झाला. आजही नागपूरात मारबत निघते ती शहरावर घोर अनिष्ट नजर पडू नये म्हणून!!

वर्‍हाडाच्या बाहेर या उत्सवाची फारशी माहिती मिळत नाही - आमचे नागपूरचे वाचक या उत्सवाची अधिक माहिती देऊ शकतील !!

सबस्क्राईब करा

* indicates required