अंतराळवीरांच्या अन्नाची समस्या सोडवण्यासाठी नासा ३.६ कोटी देत आहे...काय आहे हे चॅलेंज?

अंतराळात अनेक मोहिमा होत असतात. सामान्य माणसाला ती मोहीम यशस्वी झाली किंवा अयशस्वी याबाबतच जास्त उत्सुकता असते. पण हे अंतराळवीर अनेक अवघड आव्हाने पार करत असतात, अनेक वर्षाची मेहनत असते, अभ्यास असतो. अमेरिकेची अंतराळ संस्था नासा (NASA) या संस्थेने आतापर्यंत अनेक यशस्वी मोहीमा केल्या आहेत. अजून एक नवीन मोहिमेवर सध्या काम सुरू आहे. पण या मोहिमेत एक अडचण त्यांना भेडसावत आहे. त्याबद्दलच त्यांनी एक पोस्ट शेअर करून सर्वसामान्य लोकांना एक आवाहन केले आहे. काय आहे हे चॅलेंज?
Can we agree that no matter who or where we are, #food is our common ground? @NASAPrize and @csa_asc invite innovators to design food for the next frontier! Join the #DeepSpaceFood movement to help accelerate food technologies for and on .
— Deep Space Food Challenge (@DeepSpaceFood) January 29, 2021
https://t.co/zmckWeYk3M pic.twitter.com/m3h23jKGMM
अमेरिकेची अंतराळ संस्था नासा (NASA) मंगळावरील मोहिमेबाबत सध्या काम करत आहे. काही शास्त्रज्ञांची टीम यासाठी तयारी करत आहे. ही मोहीम अंदाजे तीन वर्षांची असेल. पण नासासमोर या दीर्घ अंतराळ मोहिमेसाठीचे असणारे मोठे आव्हान म्हणजे अंतराळवीरांच्या अन्नाची व्यवस्था करणे. ही समस्या सोडवण्यासाठी नासाने लोकांना एक चॅलेंज दिले आहे. ‘Deep Space Food Challenge' असं त्या चॅलेंजचं नाव आहे. नासाने यासाठी तब्बल ५ लाख डॉलर्स (३.६ कोटी) चे बक्षीसही ठेवले आहे.
या चॅलेंजमध्ये असं अपेक्षित आहे की हे अन्न सकस आणि दीर्घकाळ टिकणारे असावे. ते अश्या विपरीत वातावरणात तयार करता यायला हवे. पृथ्वी ते मंगळापर्यंतचे अंतर हे ११.५ कोटी किलोमीटर इतके आहे, हे अंतर जाण्यासाठी अंदाजे २ वर्षा पेक्षा अधिक काळ लागू शकतो. मंगळापर्यंतची यात्रा ही खुप लांबची असल्यामुळे अंतराळवीरांच्या अन्नाची सोय करणे बऱ्याचदा आव्हानात्मक असते. शिवाय इतक्या लांब पृथ्वीवरून अन्नसामान वाहून नेणं आणि ते जास्त काळ टिकणं शक्य होत नाही. त्यासाठीचा एकमात्रं उपाय म्हणजे अंतराळयात्रेत अंतराळवीरांच्या जेवणासाठीची उत्पादन क्षमता विकसित करणे.
अंतराळवीरांच्या जेवणाची समस्या सोडवण्यासाठी नासाने जगभरातील विद्यार्थी, शिक्षक, इंजिनिअर्स, शेतकरी अगदी सर्वसामान्य लोकांना हे आवाहन केले आहे. Deep Space Food Challenge मध्ये त्यांनी लिहिले आहे, " Can we agree that no matter who or where we are, #food is our common ground?" म्हणजे तुम्ही कोणीही किंवा कुठेही असाल अन्न ही आपली एक समान गरज आहे.
Johnson Space Center मधील अन्न तंत्रज्ञानाचे मुख्य शास्त्रज्ञ ग्रॉस डग्लस (Grace Douglas) यांनी दीर्घ अवकाश अभियानांसाठी स्प्लिट तंत्रज्ञानाद्वारे जर्नल ऑफ न्यूट्रिशन या लेखात याबद्दलच्या गरजादेखील लिहिल्या आहेत.
हे काम आव्हानात्मक आहे पण एक सुवर्णसंधी देखील आहे. या चॅलेंजसाठी जे उत्सुक आहेत त्यांनी वेबसाईटवर २८ मे पर्यंत रजिस्टर करायचे आहे. अधिक माहिती नासाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. हे चॅलेंज जास्तीत जास्त जणापर्यंत पोहोचण्यासाठी पोस्ट जरूर शेयर करा.
लेखिका : शीतल दरंदळे