computer

'फ्री ट्री' काय आहे आणि नेटकरी त्याचं कौतुक का करत आहेत ?

जगात माणुसकी शिल्लक आहे का असा प्रश्न पडावा अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. पण सुदैवाने त्याचवेळी जगात माणुसकी शिल्लक आहे याचीही उदाहरणं सातत्याने समोर येत असतात.

रोटी कपडा और मकान या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण या गरजादेखील पूर्ण होत नाहीत असे लोकही मोठ्या संख्येने आजही आहेत. बऱ्याचजणांना आपल्या परीने छोटी का असेना मदत करावी असे वाटते. तशी मदत लोक करतात देखील. पण काही लोक यातदेखील भरीव असे काम करून जातात.

सध्या असाच एक उपक्रम चर्चेत आला आहे. 'फ्री ट्री' असे नाव असलेले एक झाड असते. इथे काय करायचे असते तर फक्त या झाडाभोवती आपल्या वापरात नसलेल्या गोष्टी आणून ठेऊन द्यायच्या. ज्यांना गरज असेल ते घेऊन जातात.

हे सुरू झाले एका रेडिट् युझरच्या डोक्यालिटीमुळे. @everyusernmtaken हे या रेडिट युझरच्या अकाउंटचे नाव. त्याने या फ्री ट्री चा फोटो रेडिटवर शेअर केला. लोकांनी हि आयडिया रेडितसहित इतर समाजमाध्यमांवर उचलून धरली.

असा उपक्रम प्रत्येकाला आपल्या आजूबाजूला सुरु करणे शक्य आहे. आपल्या छोट्याशा पुढाकाराने अनेक लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलू शकते. आपण यापूर्वी महाराष्ट्रांतल्या काही गावांत माणूसकीची भिंत ही साधारण अशीच संकल्पना राबवलेली पाह्यली आहे. काही लोकांनी फ्री लायब्ररी चालू केली आहे. या फ्री लायब्ररी म्हणजे मोफत मुक्त ग्रंथालयात लोक आपली वाचून झालेली पुस्तके आणून ठेवतात आणि ज्यांना ती वाचण्याची इच्छा असेल ते घेऊन जातात.

स्थ्यानिक पातळीवर अशा अनेक संकल्पना राबवल्या जात आहेत. सगळ्यांचा हेतू आपण राहातो त्या समाजाला मदत करण्याचा आणि त्या समाजाच्या घटकांच्म जगणं सुसह्य करण्याचा आहे. अशा उपक्रमांद्वारे पूर्ण जगाच्या अडचणी नक्कीच दूर होणार नाहीत, पण एकदोघांच्या अडचणी जरी दूर झाल्या, तरी ते उपक्रमाचं यश असेल. इंग्रजीत म्हणतात तसा हा "स्मॉल डिफरन्स" खूप महत्त्वाचा आहे.

तुमच्याकडे असे काही उपक्रम केले जात आहेत का? आम्हांला त्याबद्दल नक्की कळवा.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required