computer

मेंदूच्या ऑपरेशन दरम्यान भूल न घेता पिआनो वाजवणारी मध्य प्रदेशातली मुलगी...

लहान मुलांना आपल्या आवडीची गोष्ट करू दिली तर ते तहान भूक विसरतात हे तुम्ही बघितलेच असेल. बऱ्याचवेळा डॉक्टर देखील इंजेक्शन देण्याआधी त्यांना टेडी खेळायला देतात.

मध्य प्रदेशातील मुरैना येथे सौम्या नावाची ९ वर्षांची लहान मुलगी आहे. तिला पियानो वाजवायला आवडते. पण या पोरीचे पियानो प्रेम एवढे जबरदस्त आहे की, चक्क डॉक्टर तिच्या मेंदूचे ऑपरेशन करत असताना देखील ती सर्व काही विसरून पियानो वाजवत होती. अशक्य वाटत असली तरी ही गोष्ट पूर्णपणे खरी आहे.

सहसा एखाद्याचे एवढे मोठे ऑपरेशन करायचे असेल तर त्याला भूल देऊन पूर्ण बेशुद्ध केले जाते, पण सौम्याला पूर्ण बेशुद्ध न करता फक्त डोक्याच्या ज्या ठिकाणी ऑपरेशन करायचे होते तिथे भूल देण्यात आली होती. ग्वालियर येथे झालेले हे पहिले ऑपरेशन आहे.

सौम्याला ब्रेन ट्युमर होता, ज्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून तिला सतत फिट्स येत होत्या. तिचा एम आर आय केल्यावर समजले की, सौम्याला ज्या ठिकाणी ब्रेन ट्युमर आहे, ती जागा अतिशय नाजूक आहे. पण ऑपरेशन करण्याशिवाय पर्याय नव्हता.

अशा या महत्त्वाच्या आणि अत्यंत नाजूक ऑपरेशनच्यावेळी जो गंभीरपणा असतो तो ऑपरेशनच्यावेळी अजिबात नव्हता. ऑपरेशन सुरू असताना सौम्याला पियानो वाजवायला देण्यात आला, तसेच डॉक्टर देखील अधूनमधून तिच्या सोबत बोलत होते. ऑपरेशन यशस्वी झाले आणि सौम्याच्या मेंदूमधून ट्युमर बाहेर काढण्यात आला आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required