ओलाची नवी स्कुटर बाजारात आली आहे...या स्कुटरची वैशिष्ट्ये जाणून घ्या!!

देशात सध्या इलेक्ट्रिक गाड्यांचा सुकाळ सुरू होत आहे. इलेक्ट्रिक गाड्यांकडे लोकांचा वाढता ओढा बघून अनेक मोठ्या कंपन्या या क्षेत्रात उतरत आहेत. ओला या कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर काही दिवसांत भारतात अवतरेल असे चित्र आहे. आज याच ओला स्कूटरबद्दल सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत.
भरपूर फीचर्स असलेली ओला स्कूटर बुक करणे सोपे आहे. ओलाच्या साईटवर रिझर्वेशन पेजवर जाऊन ओटीपीच्या साहाय्याने तुम्ही साइन-इन करू शकता. एकदाचे साइनइन झाल्यावर ४९९ रुपये भरून तुम्ही तुमची इलेक्ट्रिक स्कूटर बुक करू शकता. हे पैसे रिफंडेबल म्हणजेच परत मिळू शकतात. तसेच एकापेक्षा जास्त स्कूटरही तुम्हांला बुक करता येणार आहेत. या स्कूटरमधील हेडलाईट बघून तुम्हाला स्माईली इमोजीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. स्कूटरच्या सीटमध्ये ५० लिटरपर्यंत स्टोरेजची क्षमता असणार आहे. लाईटनिंगसाठी पूर्ण एलईडी सिस्टम उपलब्ध असेल, तर ब्लुटूथ, वायफाय, क्लॉउड कनेक्टिव्हिटीसहीत ७ इंचाचे कलर टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असेल.
ओलाची ही इलेक्ट्रिक स्कुटर सर्वच बाबतीत भन्नाट आहे, याचा पुरावा म्हणजे एकदा चार्ज केल्यावर १५० किलोमीटरपर्यंत ही स्कूटर चालू शकते. फक्त १८ मिनिटे चार्ज केल्यावर ५० टक्के म्हणजे ७५ किलोमीटरपर्यंत ही गाडी चालू शकणार आहे. धावण्याच्या बाबतीत देखील ही स्कूटर भन्नाट आहे. तशी ९० किलोमीटर इतका या गाडीचा वेग आहे. ही गाडी तुम्हाला जवळपास लाखभर किमतीत विकत मिळू शकेल. चालकांच्या सुरक्षिततेसाठी स्कूटरच्या दोन्ही बाजूला डिस्क ब्रेक असणार आहेत. या गाड्यांची निर्मिती ही कंपनीच्या तामिळनाडू येथील शोरूममध्ये सुरू होणार आहे. याच बरोबर कंपनीकडून देशभरात ठिकठिकाणी ५,००० चार्जिंग स्टेशन्स उभारले जाणार आहेत.
तर ओलाची ही इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला आवडली असेल तर लवकर बुक करून टाका.