ओरिओ डे: आजच्या खास दिवशी जाणून घ्या ओरिओचा खोटानाटा इतिहास नक्की काय आहे..

Subscribe to Bobhata

आज ६ मार्च अमेरिकेतला ‘ओरिओ डे’. जगात सगळ्यात जास्त लोकप्रिय असलेल्या या बिस्कीटाचं ६ मार्चला रोजी पेटंट रजिस्टर झाले म्हणून आजचा दिवस ओरिओ डे म्हणून साजरा केला जातो. गंमत अशी आहे की हे पेटंट ६ मार्च नव्हे तर १३ मार्चला रजिस्टर झाले होते. ओरीओचा संपूर्ण इतिहासत अशाच चुकीच्या खोट्यानाट्या गोष्टी भरलेला आहे.

नॅशनल बिस्कीट (नेबिस्को) कंपनीच्या नावावर पेटंट असले तरी ओरिओ ही चक्क ‘सन-राईज’ नावाच्या दुसऱ्या कंपनीची चोरलेली कल्पना आहे. ओरिओ हे नाव कसे मिळाले याच्याही अनेक कथा आहेत. त्यापैकी ओरिओ हे नाव मूळतः ग्रीक शब्दावरून आले असावे असें म्हटलं जातं. ग्रीकमध्ये ओरिओचा अर्थ ’डोंगर’ असा होतो. थोडक्यात म्हणजे सोन्याचा डोंगर. तसेच फ्रेंच मध्ये ओरिओचा अर्थ ‘ओरम’ (सोनं) असा होतो. या वरूनच ओरिओ हे नावं घेतलं असं म्हणतात. ओरिओचा कागद सुरुवातीला सोनेरी होता, त्यामुळं ही हे नाव असल्याचं अधिकच स्पष्ट होतं. असंही म्हणतात की ‘फ्री मेसन्स’ या गूढ संप्रदायानं तयार केलेलं बिस्कीटचं डिझाईन वापरलं म्हणून ओरिओ हे एवढे प्रसिद्ध झालं.  पण अर्थातच, कंपनीनं हे खोटंअसल्याचं म्हटलं आहे.

ओरिओ हे अमेरिकेत एवढं प्रसिद्ध आहे की वर्षातला एक दिवस ओरिओ डे म्हणून साजरा केला जातो.  पण शंभर वर्ष जुनं असलेलं हे बिस्कीट भारतात यायला मात्र खूप उशीर झाला. याचं कारण म्हणजे  या बिस्कीटचं क्रीम तयार करण्यासाठी यात डुकराची चरबी वापरली जायची.  त्यामुळे हे बिस्कीट कोणत्याही आशियाई देशात चालणं कठीणच. कंपनीने ही गोष्ट हेरली आणि बिस्कीट तयार करण्यासाठी वनस्पती तुपाचा वापर सुरु केला.  त्यानंतर २००९ मध्ये भारतात हे बिस्कीट मिळू लागलं. 

या दरम्यान नेबिस्को कंपनी कॅडबरी कंपनीच्या ताब्यात गेली. कॅडबरी आता मोंडेलीज या कंपनीनं ताब्यात घेतली आहे.  त्यामुळे झालं काय, की या इतिहाचा खरंखोटं तपासण्याचे सर्व मार्ग बंदच झालेत. भारतात ओरिओ इतकं लोकप्रिय झालंय की महिलांनी ओरिओला चॉकलेटच्या रसात बुडवून नवीन नवीन रेसेपी बनवायला सुरुवात केलीय. या रेसेपीची लोकप्रियता इतकी वाढली की नुकतेच ओरिओचे तुकडे असलेले कॅडबरी सिल्क 'वॅलनंटाईन डे' च्या निमित्ताने मार्केटमध्ये आणण्यात आलं.


लेखिका - रश्मी 

सबस्क्राईब करा

* indicates required