मुंबईतल्या प्रदूषण मुक्त हवेसाठी मोफत घ्या यंत्र...वाचा या यंत्राबद्दल !!!
मुंबईचा प्रदूषणात जागतिक स्तरावर ३३वा क्रमांक आहे मंडळी. WHO ने तर सर्वात जास्त प्रदूषित महानगरांत मुंबईला ५वं स्थान दिलंय. याचा अर्थ मुंबईत श्वास घेणं म्हणजे १०० सिगरेट एकत्र ओढ्ण्यासारखंच आहे. बरोबर ना ?
आता गाड्यांमधून धूर येतो म्हणून नवीन गाडी घेणं थांबणार आहे का ? किंवा लोकसंख्या वाढली आहे म्हणून लोक लग्न करणं सोडणार आहेत का ? तर नाही!!! मग आपण मुंबईची हवा शुद्ध करण्यासाठी काय करू शकतो? तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
वरील चित्रात दिसत असलेलं यंत्र तुम्ही हल्ली रस्त्याच्या डीवायडरवरती अनेकदा पाहिलं असेल. याला ‘धूळ प्रदूषण नियंत्रण यंत्र’ असं म्हणतात. या यंत्राचं काम म्हणजे बाहेरील धूर, अस्वच्छ हवा, बांधकामातील धूळ वगैरे शोषून घेऊन तीच हवा स्वच्छ स्वरुपात बाहेर फेकणं, जेणेकरून हवा श्वास घेण्यालायक आणि शुद्ध राहील. मित्रांनो हे एक अत्याधुनिक यंत्र असून हवेतील सल्फरडाय ऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, ब्रेन्झीन, फोटोकेमिकल ऑक्सिडंट यासारखे हानिकारक घटक शोषून घेतं.
(यंत्राचा आतील भाग. शोषून घेतलेले घटक.) स्रोत
या यंत्राचं महत्व लक्षात घेता ‘ठाणे महानगरपालिकेनं’ ठाण्यात २०० ठिकाणी अशी यंत्रं बसवली आहेत. खुशखबर म्हणजे तुमच्या परिसरात असंच यंत्र असावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे यंत्र तुम्हाला अगदी मोफत मिळू शकतं. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता.
विनीत कुलकर्णी
संपर्क : 9833118708
(टीम बोभाटाने ही माहिती जनहितार्थ दिली असून आमचा याच्याशी कसलाही आर्थिक संबंध नाही)





