९० च्या दशकातल्या २० अंधश्रद्धा.. तुमच्या बालपणी यातल्या कोणत्या अंधश्रद्धा होत्या??

म्हणजे बघा, एकमेकांसोबत टक्कर झाली की  शिंगं फुटतात आणि मग लगेच थुंकलं की ती शिंगं येत नाहीत, MRF कंपनी बॅट बनवते. तळहाताच्या कोपऱ्याला असलेल्या रेषा तुम्हाला किती मुलं होणार हे दाखवतात, मोरपीस पुस्तकात ठेवलं की त्यातून आणखी मोरपीस तयार होतात, पेन्सिलचा कचरा आणि दुध एकत्र करून खोड रबर तयार होतो, रेल्वे रुळावर चिल्लर ठेवले की त्याचं लोहचुंबक तयार होतं, दोन्ही हातांची मधल्या बोटांची टोकं एकत्र करुन हात नमाज पढल्यासारखे उघडले आणि दोन्ही तळहातांच्या रेषा मिळून चंद्रकोर तयार होत असेल तर लव्हमॅरेज होतं इत्यादी इत्यादी.

९० च्या दशकात बालपण गेलेल्यांना त्या काळातील काही प्रसिद्ध अंधश्रद्धा नक्कीच आठवत असतील.

सध्या #90sKidsRumors हा हॅशटॅग व्हायरल होत आहे. हा हॅशटॅग वापरून नेटकरी आपल्या बालपणातील अशाच अंधश्रद्धा बोलून दाखवत आहेत. आणि काय आश्चर्य सगळीकडेच सेम टू सेम अफवा पसरल्या होत्या राव. बघा तरी यातली कोणती अफवा तुमच्या बालपणी होती.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

तुमच्या पण बालपणी अशाच अंधश्रद्धा होत्या का ? यापेक्षा वेगळ्या असतील तर शेअर करायला विसरू नका !! 

सबस्क्राईब करा

* indicates required