computer

पेट्रोल महाग झाले म्हणून घोड्यावर बसून कामाला जाणारा माणूस !

लोक सध्या गाड्यांना पर्याय शोधायला लागले आहेत. पेट्रोल आणि गाड्यांच्या किमती दोन्ही काय परवडेबल राहिल्या नाहीत. लोक मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. मात्र औरंगाबाद येथील एका गृहस्थांनी थेट घोड्याकडे मोर्चा वळवला आहे. घोड्यावरून कामाला जाणारा हा माणूस बघून लोक मात्र जागीच थबकत आहेत.

युसूफ शेख हे ५० वर्षीय गृहस्थ लॅब असिस्टंट म्हणून कामाला आहेत. लॉकडाऊन लागण्यापूर्वी सर्व ठीक होते, पण लॉकडाऊन लागले आणि अनेकांच्या आयुष्यात अनेक बदल झाले. यावेळी बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या सुटल्या, काहींच्या नोकऱ्या राहिल्या पण पगार बरेच कमी झाले. काही असो, पण नेहमीइतका किंवा काहीच पगार नसल्याने लोकांना घर चालवण्यासाठी दुसरे काम शोधणे भाग पडले.

युसूफ शेख यांनी काही लोकांना सोबत घेऊन आवश्यक सेवेची कामे जसे भाजीपाला विकणे असे काम सुरू केले. जाधववाडी मार्केटमधून होलसेल सामान घेऊन औरंगाबाद शहरात विकत त्यांनी पैसे येण्याचे काम सुरू झाले. हळूहळू गोष्टी सुरळीत व्हायला सुरुवात झाली आणि लोकांना कामावर परत येण्यास सांगण्यात आले.

युसूफ शेख यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ते लॅब असिस्टंट म्हणून नोकरीवर होते. तिथे त्यांना कामावर हजर होण्यास सांगण्यात आले. आता लॉकडाऊनपूर्वी शेख यांच्याकडे साधी गाडी होती. पण आता सध्याचा काळ महागाईचा भडका उडाल्याचा आहे. सार्वजनिक वाहतूकही अद्याप पूर्ववत झाली नाहीय.

पेट्रोलचे भाव लिटरमागे ११० रुपये आहे, तर नवीन गाडीची किंमत ही आकाशाला भिडत आहे. आता जुनी गाडी घेऊन १६ किमी दूर असलेल्या कामाच्या ठिकाणी कसे जायचे हा त्यांना प्रश्न पडला. याचवेळी त्यांच्या एका नातेवाईकाने एक घोडा विक्रीस काढला होता. त्यांनी जुनी गाडी विकून हा जिगर नावाचा घोडा ४० हजारांत विकत घेतला.

आता मात्र रस्त्यावरून फिरताना त्यांना सर्व घोडेवाला म्हणून ओळखायला लागले आहेत. ना ट्रॅफिकचे टेन्शन आणि ना सिटी पोलिसांचे टेन्शन अशी गोष्ट शेख यांची आता झाली आहे. कॉलेजला जाऊन शेख तिथेच घोडा लावतात. अधूनमधून घोड्याला पाणी, चारा ते जाऊन देऊन येतात.

या वाचलेल्या पैशातून त्यांचा इतर घरखर्च होतो. याप्रकारे त्यांनी महागाईवर जालीम उतारा शोधलेला पाहायला मिळत आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required