अस्वलाची पिल्लं चक्क लहान मुलांसारखी नाचत आहेत...हा दुर्मिळ क्षण एकदा तरी बघायलाच हवा !!

आज आम्ही प्राण्यांच्या गमतीजमतींचा एक दुर्मिळ क्षण तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हा क्षण फिनलंडच्या वॅलटेरी म्यूलाकानेन या फोटोग्राफरने काही वर्षापूर्वी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला होता. नुकतंच त्याने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. हा क्षण दुर्मिळ का आहे हे तुम्हीच पाहा.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Valtteri Mulkahainen (@valtterimulkahainen) on

या फोटोचं वैशिष्ट्य म्हणजे या फोटोमध्ये अस्वलाची ३ बछडी चक्क नाचताना दिसतायत. त्यांनी लहान मुलांप्रमाणे हातात हात घातले आहेत आणि गोल गोल फिरत आहेत. वॅलटेरी म्यूलाकानेन त्यावेळचा किस्साही सांगितला आहे. तो म्हणतो, की ‘त्यावेळी अस्वलाची पिल्लं लहान बाळांसारखी वागत होती. मला असं वाटलं मी माझ्या घराजवळच्या प्लेग्राऊंडवर आहे.’

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Valtteri Mulkahainen (@valtterimulkahainen) on

आपल्याला वाटू शकतं की हा एक साधारण फोटो आहे, पण खरं तर या फोटोच्या माध्यमातून आणि वॅलटेरी म्यूलाकानेनने जे पाहिलं त्याच्या माध्यमातून अस्वलांना समजून घेण्यात मदत होऊ शकते. वॅलटेरी म्यूलाकानेन म्हणतो, की ‘या तिन्ही पिल्लांचे स्वभाव वेगवेगळे होते. त्यांच्या स्वभावानुसार ते वागत होते.’ पुढे तो म्हणतो, की ‘हा अनुभव म्हणजे आपण सिनेमात प्राण्यांना नाचताना, गाताना पाहतो तसा होता.’

तर मंडळी, तुम्हाला कसा वाटला हा फोटो. तुमच्याकडे असा एखादा भन्नाट क्लिक असेल तर आम्हाला नक्की  पाठवा. 

सबस्क्राईब करा

* indicates required