या जोडप्याने आपल्या बाळाला १६१६ इंजेक्शन्सच्या मध्ये का झोपवलं ?? कारण जाणून घ्या !!

ॲरिझोनाच्या एका जोडप्याने आपल्या मुलीचा जन्म अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. त्यांनी तब्बल १६१६ इंजेक्शन्स सोबत बाळाचा फोटो काढला आहे. कोणी आपल्या बाळाचा असा फोटो का काढेल ? असा प्रश्न पडला असेल ना ? चला तर त्यांनी असं का केलं ते समजून घेऊया...

मंडळी, बाळाचे आई वडील पॅट्रिशिया आणि किंबर्ली ओ’नील हे बाळासाठी गेल्या ४ वर्षांपासून प्रयत्न करत होते. ४ वर्ष ७ वेळा प्रयत्न केल्यानंतर यावर्षी अखेर आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे (इन विट्रो फर्टिलायझेशन) त्यांना बाळाला जन्म देण्यात यश आलं आहे.

या ४ वर्षात त्यांना आयव्हीएफची १,६१६ इंजेक्शन्स देण्यात आली होती. आश्चर्य म्हणजे त्यांनी हे सारे इंजेक्शन्स जपून ठेवले होते. आपल्या बाळाचा जन्म याच इंजेक्शन्स सोबत साजरा करण्याची कल्पना त्यांनी फोटोग्राफरला बोलून दाखवली. त्याप्रमाणे फोटोग्राफर समँथा पॅकर यांनी तासभर खपून इंजेक्शन्सना हृदयाच्या आकारात सजवलं. शेवटी काय कमाल फोटो आला आहे हे तर तुम्ही पाहतच आहात.

मंडळी, हे इंजेक्शन्स म्हणजे बाळाला जन्म देण्यासाठी दोघांनी किती प्रयत्न केले याचं जणू प्रतिकच आहे.

 

आणखी वाचा :

जगातल्या आणि भारतातल्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीची गोष्ट !

सबस्क्राईब करा

* indicates required