computer

चिकन मॉम, प्लू आणि मेव्हणी'ज सँडविच- यातले कोणते नमुनेदार मेन्यूकार्ड्स तुम्ही पाह्यलेत!!

त्याचं काय आहे, हॉटेलात जाऊन खाणं काही कुणाला चुकलं नाहीय. कधी हौस म्हणून, तर कधी दुसरा काही पर्याय नाही म्हणून, कधी ना कधी हॉटेलाची पायरी चढायलाच लागते. आणि मग समोर येतात, एकापेक्षा एक भलभलते मेन्यूज. कधी असतात हुकलेल्या इंग्रजीतले मेन्यूज, तर कधी आपल्या मायबोलीतले. इंग्रजीत तर एकेका पदार्थाचं नांव काय होईल याचा काही नेम नसतो राव! आणि जेव्हा लोक आपल्या मायच्या भाषेत मेन्यू लिहितात, तेव्हा असलं मस्त डोकं लावतात  की ज्याचं नांव ते. मग ते लोक पुण्याचे असतील तर काय विचारायलाच नको. 

कधी असले मेन्यू वाचून ऑर्डर दिलीये का  आक्कांनो आणि भावांनो?? चला बघा, आणि सांगा यातले कुठे मेन्यू तुमच्या नजरेखालनं गेलेत ते!!

ड्रॅगन मॉम!!

आधीच आई हा प्राणी लै डेंजर असतोय. त्यात ड्रॅगनची पण आई म्हंजे तर आणखीनच डेंजर.  ज्यांनी ज्यांनी ल्हानपणी आईच्या हातचा बेदम मार खाल्लाय- म्हंजे आपल्या सगळ्यांनाच- त्यांना हे लग्गेच पटेल. हाय का न्हाय?

प्रेमाचा मेन्यू

नशीब, बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी नाहीय. नाहीतर लोकाना काहीच खायला मिळाले नसते. 

मठ्ठ बिर्याणी कुठली..

अहो, दम असतो तो.  म्हणजे द्यायचा दम नव्हे काही.. ती असते वाफ!!  डम्ब कुठचे!

रेष्टुरंट म्हणे...

बिच्चारी मेव्हणी..

गर्ल सँडविच

गर्ल सँडविच, बॉय सँडविच, मेल सँडविच, फिमेल सँडविच आणि कसलं सँडविच राह्यलंय का??

अर्थाचा अगदी अनर्थ करून ठेवतात!

पूप, शूप आणि चीली.... अहो, जरा काना मात्रा इकडे तिकडे झाला, की अर्थ चार मैलांवर दूर जातो की हो.. 

न खाता गिऱ्हाईक बाहेर पडलं, की जाळ अन् धूर संगटच!!

हे नक्की पुण्यातच असणार. १०१टक्के..

मेन्यू आहे की लाटणी?

शेजारी पापड लाटायला लाटणं कमी पडतंय? अहो जा की घेऊन. इथं एखादा पदार्थ कमी दिसेल, इतकंच!

 

मंडळी, हे झाले फकस्त नमुने. असे अनेक नमुने आजूबाजूला आणि इंटरनेटवर असतील. तुमच्याकडे काय असतील ते आमच्यासोबत पण करा की राव!!

सबस्क्राईब करा

* indicates required