computer

31 मार्च जवळ आलाय, टॅक्स प्लॅनिंग केलयं का?? या पाच टिप्स लगेच बघून घ्या

मार्चचा महिना उजाडला की तुमच्या-माझ्यासारख्या लोकांना एक गोष्ट फार सतावते. टॅक्स प्लॅनिंग. अहो, आपल्या हक्काच्या कमाईवर लागणारा कर वाचवण्याची सरकारने दिलेली संधी. तुम्ही वर्षाच्या सुरवातीपासून प्लॅनिंग केलेलं नसणार. तर मग आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ५ सोप्या टीप्स ज्या तुम्हाला ३१ मार्चपर्यंत टॅक्स वाचवायला मदत करतील.

१. सेक्शन ८०C चा पूर्ण फायदा उचला

इन्कमटॅक्स कायद्याच्या सेक्शन 80c नुसार तुमची १.५ लाखापर्यंतच्या सेव्हिंगवर टॅक्समधून सूट मिळते. बरेचदा आपण याचा पूर्ण फायदा न घ्यायची चूक करू शकतो. तुमच्या लॉंग टर्म प्लॅननुसार योग्य ती इन्व्हेस्टमेंट करणे खूप गरजेचे आहे. इतरांच्या सल्ले डोळे झाकून अंमलात आणण्याऐवजी  तुम्हाला पटतील, त्याच इन्व्हेस्टमेंट करा.

2. हेल्थ इन्शुरन्स नक्की घ्या

तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स नाही? तर मग तुम्ही ऑफिसच्या गृप पॉलिसीवर अवलंबून आहात. असे असेल तर आजच्या आज एक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घ्या. सेक्शन 80d नुसार तुम्हाला २५००० रुपये प्रीमियमपर्यंत करातून सूट मिळते. तसेही आज काल हॉस्पिटलवर होणारा खर्च पाहता योग्य हेल्थ इन्शुरन्स असणे खूप गरजेचे आहे

3. 80c च्या पलीकडे जाऊन

80c च्या पलीकडे जाऊनही काही योजना आहेत, ज्याचा फायदा आपण घेऊन शकतो. तुमच्या बचत खात्यात येणाऱ्या १०००० रुपये पर्यंत व्याजावर सेक्शन 80tta खाली करातून सूट मिळते. या शिवाय राजकीय पक्ष किंवा NGO ना दिलेल्या देणग्यावरही सेक्शन 80g खाली सूट मिळू शकते.

4. प्रोफेशनल्सची मदत घ्या

जवळच्या एल आय सी एजंट असलेल्या नातेवाईकापासून ते जवळच्या मित्रांपर्यंत( यात आम्ही सुद्धा आलो) अनेक जण तुम्हाला सल्ले देतील. जास्तीत जास्त माहिती स्वतः मिळवा किंवा एखाद्या जाणकार फायनान्स प्लॅनरचा सल्ला घ्या.

5. पुढच्या वर्षीचे प्लॅनिंग आजच सुरू करा!!

पुढच्या वर्षी परत हीच पोस्ट वाचायची नाहीय ना? मग त्यासाठी आजपासूनच पुढच्या वर्षीच्या टॅक्स प्लॅनिंगच्या  तयारीला लागा. लवकर सुरवात केली तर तुमचा कोणताही निर्णय घाईघाईत होणार नाही आणि एका चांगल्या लॉंग टर्म प्लॅनवर तुम्हाला काम करता येईल.

चला तर मग, पटापट लागा कामाला. तोवर आम्ही पण आमची टॅक्स सेव्हिंग करतो..

सबस्क्राईब करा

* indicates required