इरफानला झालाय 'न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर'...जाणून घ्या काय आहे हा आजार !!

गेल्या काही वर्षात सिनेमाचा चेहरा मोहरा बदलला आहे. आशयघन सिनेमे येत आहेत, हिरो टाईप चेहरे असलेल्या नटांपेक्षा अभिनय ज्याला येतो अश्या अभिनेत्यांची मागणी वाढत आहे. यातलाच एक आघाडीचा अभिनेता म्हणजे इरफान खान. इरफान खानच्या प्रकृतीबद्दल काही दिवसांपूर्वी एक बातमी आली आणि खळबळ माजली.

इरफानने ट्विट करून आपल्याला एक दुर्धर आजार झाला असल्याचं सांगितलं. त्याने नेमका कोणता आजार झाला आहे याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं, त्यामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आलं. पण आता या चर्चा थांबणार आहेत कारण इरफानने स्वतः याबद्दल एक महत्वाचा खुलासा केला आहे.

इरफान ला  न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर हा एक गंभीर आजार झाला आहे.

काय आहे न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर  ??

या प्रकारच्या ट्युमरचे २ प्रकार आहेत.

1. एन्डोक्राइन ट्यूमर
2.
न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर 

एन्डोक्राइन ट्यूमर हार्मोन्स बनवणाऱ्या पेशींशी निगडित आहे. शरीरात हार्मोन्स तयार करणाऱ्या  एन्डोक्राइन सिस्टम वर ह्या ट्युमरमुळे परिणाम होतो. एन्डोक्राइन सिस्टम ज्या पेशींनी तयार झालेला असतो त्या पेशींची अनियंत्रित वाढ होऊ लागते आणि ट्युमर स्वतः हार्मोन्सची निर्मिती करू लागतो. ट्युमर दोन प्रकारचे असतात. पहिल्या प्रकारचा ट्युमर निरुपद्रवी (Benign) आणि दुसरा प्रकार कर्करोगाचा ट्युमर (Malignant).

स्रोत

न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर हा प्रकार वर सांगितल्या प्रमाणेच आपल्या मज्जा संस्थेवर हल्ला करतो. न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर  झालेल्या व्यक्तीला ब्लड प्रेशरचा त्रास होतो. उलटी, डोके दुखी, प्रमाणाबाहेर घाम फुटणे, ताप, हृदयाचे अनियमित ठोके अश्या प्रकारची लक्षणं दिसतात. या आजारावर होणारे उपचार त्याच्या स्टेजेसनुसार ठरतात. न्यूरोएन्डोक्राइन चे फेक्रोमोसायटोमा, मर्केल सेल कॅन्सर, न्यूरोएन्डोक्राइन कार्सिनोमा, पॅरागँग्लिओमा असे प्रकार सुद्धा आहेत. या प्रकारांनुसार देखील उपचार ठरवला जातो.

इरफानचा आजार किती गंभीर आहे यावर त्याची पुढील उपचार पद्धती ठरेल. त्यानेच सांगितल्या प्रमाणे तो उपचारासाठी लंडनला जाणार आहे. 

सध्या त्याचा आजार बरा व्हावा हीच प्रार्थना आपण करू शकतो.

सबस्क्राईब करा

* indicates required