computer

या ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!

एखाद्या स्थळाला, तिथल्या माणसांना, तिथल्या संस्कृतीला अस्सलपणे टिपण्यासाठी ट्रॅव्हेल फोटोग्राफी हा उत्तम मार्ग आहे. सध्या सगळ्यांच्याच हातात मोबाईल आणि कॅमेरा आलेला असला तरी कोणीही उठून ट्रॅव्हेल फोटोग्राफर होऊ शकत नाही. त्यासाठी एक वेगळी दृष्टी लागते. आजूबाजूला एवढ्या गोष्टी घडत असतात की त्यातली नेमकी कोणती गोष्ट कॅमेऱ्यात कायमची बंदिस्त करायची हे कळण्यासाठी अनुभव लागतो.  हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे सध्या Anastasiya Dubrovina या बेलारूसच्या फोटोग्राफरने भारतभर फिरून टिपलेले फोटो प्रसिद्ध झाले आहेत.

आजच्या लेखातून आपण या गुणी फोटोग्राफरविषयी आणि तिने टिपलेल्या भारताची छोटीशी झलक पाहणार आहोत. चला तर सुरु करूया.

Anastasiya Dubrovina हि गेल्या ११ वर्षांपासून फोटोग्राफी करत आहे. बेलारूसच्या लहान शहरांमध्ये काही व्यावसायिक फोटोग्राफी आणि लग्नासमारंभात फोटोग्राफी करून ती चरितार्थ चालवत होती. सध्या ती रशियामध्ये राहत असून जगभर फिरून ट्रॅव्हेल फोटोग्राफीच्या माध्यमातून प्रोजेक्ट्स करत आहे. तिचं म्हणनं आहे की, 'मी एखाद्या ठिकाणी गेले आहे आणि फोटो घेतले नाहीत, असं होऊच शकत नाही. मला फिरायचं आहे, नवीन गोष्टी शोधायच्या आहेत आणि अनेक माहित नसलेल्या ठिकाणांना कॅमेऱ्यात टिपायचं आहे." 

भारतीय शहरांना तिने आपल्या कॅमेऱ्यात टिपणं महत्त्वाचं आहे कारण हा तिचा पहिलाच ट्रॅव्हेल फोटोग्राफी प्रोजेक्ट होता. तिने  यासाठी कसून तयारी केली होती. कॅमेऱ्यात काय टिपायचं आहे इथपासून ते त्याची प्रक्रिया कशी असेल इथपर्यंत तिने सर्व गोष्टींचा आधीच विचार केला  होता. यानंतर तिने २ आठवड्यांच्या कालावधीत भारतातील सर्वच प्रमुख शहरांना भेट देऊन फोटोग्राफी केली. तिला भारतातलं सगळ्यात आवडलेलं शहर म्हणजे वाराणसी. तिथली गर्दी, मरणाच्या दारात असताना येणारे लोक, गंगेच्या किनारी होणारं दहन या सगळ्या गोष्टी आकर्षित करून गेल्या.  

भारतातील छोट्या शहरांमध्ये होणारे जातिव्यवस्थेचे पालन, वाराणसी शहरात दररोज होणारा अंत्यसंस्कार विधी, दिल्लीच्या मधोमध असलेली प्रचंड गजबज आणि मुंबईच्या दुर्लक्षित झोपडपट्ट्या इत्यादी दृश्यांनी तिला आश्चर्यचकित केलं.

चला तर आता Anastasiya Dubrovina च्या फोटोग्राफीकडे वळूया. 

सबस्क्राईब करा

* indicates required