computer

ट्राफिक जाम बद्दल तक्रार केल्यावर ट्राफिक पोलिसांनी काय केलं पाहा !!

वाहतूक  कोंडीत दोन व्यक्तींना सर्वात जास्त त्रास होत असतो. एक म्हणजे गाडीत बसलेल्या माणसाला आणि दुसरं म्हणजे ट्राफिक पोलिसाला. ट्राफिकमध्ये या दोघांच्याही सहनशक्तीची परीक्षा बघितली जाते. आज आम्ही जो किस्सा सांगणार आहोत तो याच सहनशक्तीवर आधारित आहे.

फिरोजाबाद येथील एका रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. सोनू चौहान हा तिथे अडकलेल्या अनेक लोकांपैकी एक होता. बराचवेळ झाला पण ट्राफिक हलत नाही बघून सोनू चौहानची सटकली. त्याने थेट पोलीस अधीक्षकांना गाठून तक्रार केली. पुढे जे घडलं ते नक्कीच यापूर्वी घडलं नसेल.

पोलीस अधीक्षक सचिंद्र पटेल यांनी सोनूलाच वाहतूक कोंडी सोडवण्याची जबाबदारी दिली. पुढचे २ तास तो ट्राफिक पोलिसांसोबत मिळून वाहतूक सुरळीत करण्याचं काम करत होता.

ही फक्त एक गंमत नव्हती बरं. सोनूने ट्राफिक पोलिसांचं हेल्मेट आणि जाकीट घातलं. २ तास स्वतः नेतृत्व करून वाहतूक सुरळीत केली. यावेळी एकूण ८ गाड्यांना दंड ठोकण्यात आला. एकूण १६०० रुपये एवढी दंडाची रक्कम गोळा झाली.

हा अशा प्रकारचा पहिला प्रयोग होता. फिरोजाबादचे ट्राफिक इन्स्पेक्टर रामदत्त शर्मा म्हणाले की आम्ही  अशा प्रकारचे प्रयोग करत राहू, जेणेकरून लोक वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतील.

मंडळी, या अनुभवातून सोनूनेही चांगलाच धडा घेतला आहे. तो म्हणाला की ट्राफिक पोलिसांचं काम किती कठीण असतं हे आता मला समजलं आहे.

तर, हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला? असा प्रयोग महाराष्ट्रातल्या शहरात केला तर तुम्हाला आवडेल का ?

सबस्क्राईब करा

* indicates required