computer

युपीचे पोलीस काठ्यांवर बसून कसला प्रयोग करतायत ? काय आहे ही भानगड ?

यूपीतील पोलीस आपल्या अफलातून प्रयोगांसाठी नेहमी चर्चेत असतात. मध्यंतरी बंदुकीतील गोळ्या संपल्या म्हणून पोलिसांनी चक्क तोंडातून बंदुकीचा आवाज काढल्याची घटना ताजी असताना आता पण काहीसा तसाच किस्सा घडला आहे !!

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच वायरल झाला आहे, त्यात पोलिस त्यांच्या काठ्या पकडून घोड्यावर बसून चालतात तसे चालताना दिसत आहेत. तर या फोटोमागे वेगळेच कारण असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांना गर्दी नियंत्रित करण्यासाठी गर्दीत जाऊन घोडे चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार होते. पण त्यासाठी त्यांच्याकडे घोडेच नव्हते, मग काय गड्यांनी भन्नाट आयडीया शोधून काढली. त्यांनी थेट आपल्या काठीलाच घोड़ा बनवले आणि त्यावर त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना किती प्रशिक्षण मिळाले ही वेगळी गोष्ट मात्र बघ्यांचे चांगलेच मनोरंजन झाले आहे. 

मंडळी, नंतर तिथल्या अधिकाऱ्यांनी सारवासारव करताना सांगितले की, हे फक्त डेमो प्रशिक्षण होते, जेव्हा खरे प्रशिक्षण देण्यात येईल तेव्हा त्यांना घोडे देण्यात येतील. आता खरे खोटे त्यांनाच माहीत, पण यूपी पोलिसांचे पुन्हा एकदा हसू झाले हे निश्चित!!!

 

लेखक : वैभव पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required