computer

पोलीस कथा - १ : पोलीस आणि बाळाचा खळखळून हसतानाचा हा फोटो आणि त्याच्या मागची सत्यकथा !!

काही वर्षांपूर्वी एका लहान मुलाला आपल्या हातात धरून उभ्या असलेल्या पोलिसाचा एक फोटो व्हायरल झाला होता. निखळ हास्य असलेला ते  लहान बाळ आणि पोलीसांचा हा फोटो बघून संपूर्ण देशाला आनंद झाला होता. तो लहान बाळ होता फैजान आणि ते पोलीस होते नामपल्ली पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय कुमार. या फोटो मागील गोष्ट वाचली तर तुम्हाला देखील कौतुक वाटेल. 

तेलंगाणाची राजधानी हैद्राबाद येथे या लहान मुलाला अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सोडविण्यात आल्यानंतर घेतलेला हा फोटो आहे. हैद्राबाद येथून या लहान मुलाचे अपहरण करण्यात आले होते. तो लहान मुलगा आपल्या आईसोबत हैद्राबादच्या रस्त्यांवर झोपला होता त्याचे अपहरण करण्यात आले होते. त्या मुलाचे नाव फैजान खान होते. त्याची आई हमीरा बेगम या भीक मागून आपले पोट भरत असत. घर नसल्याने फुटपाथवरच झोपून ते दिवस काढत होते. फैजानचे अपहरण करून त्याला विकून टाकण्याचा कट मोहम्मद मुस्ताक आणि मोहम्मद युसूफ या दोघांनी रचला होता. 

हमीरा बेगम सकाळी उठली तेव्हा त्यांना आपला मुलगा नसल्याचे समजले त्यांनी पोलिसांत तक्रार दिल्यावर पोलिसांनी १५ तासात फैजानला शोधून दाखवले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने पोलिसांनी या अपहरणकर्त्यांचा शोध घेतला होता.

नामपल्ली पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय कुमार यांच्या अतिशय चलाखीने त्या मुलाला सोडविणे शक्य झाले होते. संजय कुमार यांनी सांगितले की, 'फैजानला सोडवून आणल्यावर तो रडत होता, पण त्याला कसे कळले माहीत नाही, माझ्या हातात आल्यावर त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य उमटले.' अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सोडवून आणल्यावर त्या मुलाला हातात धरलेला फोटो व्हायरल करून संजय कुमार यांना पूर्ण देशाने सलाम केला होता. सुरुवातीला हा फोटो आयपीएस स्वाती लाक्रा यांनी ट्विटरवर शेअर केला होता. तिथे त्या फोटोला ५,००० पेक्षा जास्त रिट्विट्स तर २२,००० पेक्षा जास्त लाईक्स मिळाले होते. काहींनी या फोटोला 'फोटो ऑफ द एअर' म्हणून देखील घोषित केले होते.

तर अशी होती या फोटो मागची गोष्ट. पोलीस निरीक्षक संजय कुमार आणि त्यांचे टीमला सलाम. 

सबस्क्राईब करा

* indicates required