सांगलीच्या पठ्ठ्यानं बनवलंय हेलिकॉप्टर....वाचा ध्येयवेड्या मराठी जिद्दीची कथा !!

स्वप्नं बघावी आणि त्यांना साकार सुद्धा करावं. यासाठी नेहमीच झुंजत राहणं गरजेचं आहे. आपल्या सांगलीच्या एका पठ्ठ्यानं हेच दाखवून दिलंय भाऊ. लोक कार, बाईक घेण्याची स्वप्नं पाहतात पण या पठ्ठ्यानं चक्क हेलिकॉप्टर बनवायचं स्वप्न बघितलं.

कोण आहे हा ध्येयवेड्या तरुण ? आणि त्यानं हे सगळं साध्य कसं केलं ?

स्रोत

तर,लहानपणापासून प्रदीप मोहितेचं स्वप्ना होतं की आपण एकदिवस हेलिकॉप्टर मधून आकाशाकडे झेप घ्यायची. पण हे जरा महागडं स्वप्न आहे ना? तेव्हाच्या परिस्थितीत  अर्थातच आर्थिक कारणांमुळं त्याला हे स्वप्न पूर्ण करता आलं नाही. अभ्यासात लक्ष लागत नसल्यानं त्यानं शाळा सोडली आणि एका गॅरेजमध्ये कामाला लागला. पुढे त्यानं स्वतःचं गॅरेज सुरु केलं. सध्या तो पिंपरी चिंचवड येथे स्वतः चं गॅरेज चालवतो. पोटापाण्याचा बंदोबस्त करताकरता त्याचं स्वप्न मागे पडलं होतं. मग एकदिवस आला थ्री इडियट सिनेमा आणि सगळं बदललं.

स्रोत

२००९ साली त्याने थ्री इडियट सिनेमा बघितला. सिनेमात दाखवलेल्या हेलिकॉप्टरच्या दृश्याने त्याच्या स्वप्नांवर साचलेली धूळ झाडली. प्रदीपने अवघ्या ३ वर्षात आपला संसार सांभाळून हेलिकॉप्टर तयार केलं. हेलिकॉप्टर बनवणं तितकं सोप्पं नव्हतं. प्रदीपला कोणतेही प्रशिक्षण मिळालेलं नाही, त्यामुळे हेलिकॉप्टरच्या टेस्टिंग दरम्यान त्यांचा अपघात झाला. पण सुदैवाने त्याला मोठी दुखापत झाली नाही. अशा अपघातांमुळे हेलिकॉप्टरच्या कामात अडथळे येत गेले. शेवटी यावर्षी त्याने हेलिकॉप्टर यशस्वीपणे तयार केलं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये एकावेळी दोनजण बसू शकतात व दीड तास ३०० फुटांपर्यंत ५० किलोमीटरच्या भागात उड्डाण करता येतं.

प्रदीपला या अफलातून कामगिरीसाठी ‘हिंदुस्थान एरोनॉटिक लिमिटेड’कडून ‘ध्रुव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय.

स्रोत

प्रदीपने या हेलिकॉप्टरसाठी गॅरेजच्या कामातून येणारे पैसे आणि गावची जमीन विकून ४० लाख रुपये उभे केले. त्याला भविष्यात भारतीय सैन्यासाठी हेलिकॉप्टर तयार करायचे आहेत. सध्या त्याला आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. तो घर आणि काम सांभाळून आपलं काम करतोय. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने त्याच्या मागे उभं राहण्याची आज आवश्यकता आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required