computer

व्हिडीओ ऑफ दि डे : त्याने पळून जाण्यासाठी चक्क स्वतःच्याच मुलीचा वेश घेतला ?

नुकताच आपल्याकडे ‘बदला’ नावाचा सिनेमा येऊन गेला. त्यात आरोपीकडून खऱ्या गोष्टी वदवून घेण्यासाठी संपूर्ण अवतार बदलून एक व्यक्ती येते. हे आता सिनेमात शक्य आहे हो, पण खऱ्या आयुष्यात असं काही करायला गेलात तर नक्कीच पकडले जाण्याची शक्यता असते. ब्राझीलच्या या कैद्याचं पण हेच झालं. हा व्हिडीओ पाहा.

ही व्यक्ती ब्राझीलचा ड्रग डीलर आहे. त्याचं नाव क्लाव्हीनो दा सिल्वा. त्याची मुलगी त्याला भेटायला जेलमध्ये आली होती. तेव्हा त्याने तिला जेलमध्येच ठेवून स्वतः तिच्या अवतारात जेलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.

सिल्व्हाने आपल्या मुलीचा वेष किती अचूक वठवला होता हे तुम्ही व्हिडीओमध्ये पाहिलंच आहे, पण त्याची ही आयडिया लगेचच पकडली गेली. निमित्त झालं त्याचं अवघडलेपण. तो लगेचच नजरेत आला.

मंडळी, सिल्व्हा हा ७३ वर्षांच्या कैदेची शिक्षा भोगत होता. पळून जाण्याचा प्रयत्न फसल्यावर त्याची पुन्हा जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती. 

कालच आलेल्या बातमीनुसार सिल्व्हा त्याच्या तुरुंगातल्या सेलमध्ये मृत आढळला आहे. पोलीस म्हणतायत की पळून जाण्याचा प्रयत्न फसल्याने त्याने आत्महत्या केली.