समुद्रावर विलक्षण साहस हा पुरस्कार मिळवणाऱ्या जगातल्या पहिली महिला राधिका मेनन.

पाच वर्षांपूर्वी राधिका मेनन हे नाव चर्चेत आले होते. तेव्हा राधिका भारतीय मर्चंट नेव्हीच्या पहिल्या महिला कॅप्टन झाल्या होत्या. आता परत एकदा त्यांचे नाव चर्चेत आले आहे, इंटरनॅशनल मेरिटाईम ऑर्गनाझेशनतर्फे दिल्या जाणार्‍या समुद्रावरील विलक्षण साहसासाठी (Exceptional Bravery at Sea) पुरस्कार देण्यात येणार आहे. सात मासेमारांचे जीवन वाचववण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

दुर्गाम्मा नावाची बोट वादळामध्ये आंध्रप्रदेशाच्या काकींनाडापासून ओडीसाच्या किनाऱ्याकडे खेचली गेली होती. त्या बोटीवर असलेल्या मासेमारांनी वाचण्याची  आशाच सोडून दिली होती. त्याचवेळेस राधिका यांच्या बोटीला ही बोट दिसली व त्यांच्या चमूने लगेच या लोकांना वाचवले.

भारतीयांची मान अभिमानाने उंचावणाऱ्या राधिका मेनन यांना आमचा बोभाटा सलाम.

सबस्क्राईब करा

* indicates required