computer

बुधवारी आपल्याकडे राफेल विमाने आली. परंतु त्याआधीच एक राफेल आपल्याकडे होत!!

तब्बल ५८,००० कोटी रुपयांचा करार करून मागवलेल्या एकूण ३६ विमानांपैकी पहिल्या पाच विमानांचा ताफा भारतात दाखल झालाय! या बातमीने देशभरातल्या न्यूज चॅनल्सच लक्ष वेधलं होतं! बुधवारी दिवसभर सर्व न्यूज चॅनल्सवर राफेलचीच बातमी होती!

इकडे सोशल मीडिया मात्र एका वेगळ्याच "राफेल" च्या नादात गुंग होता! लॉयड मॅथीस, एचपीचे भूतपूर्व मार्केटिंग प्रमुख यांनी राफेलबद्दल ट्विट केलं होतं आणि ते राफेल दुसरं तिसरं काही नसून "राफेल पानमसाला" होतं! आणि मग या पानमसाल्याने सगळ्यांचच लक्ष वेधलं! अधिक माहिती घेतली असता असा एक खरोखरच पानमसाला आहे आणि त्याची स्वतःची वेबसाईटसुद्धा आहे असं लक्षात आलं. तिथे हा पानमसाला तंबाखू आणि निकोटिन विरहित आहे अशी जाहिरातही केली होती!

एवढंच नाही, तर या ब्रँडची एक बारा सेकंदांची व्हिडिओरुपी जाहिरातदेखील आहे. या जाहिरातीत राफेल विमानांचा वापर करण्यात आला आहे. यूट्यूबवरची ही जाहिरात नऊ महिन्यांपूर्वीची आहे. २०१९ मध्ये हा राफेल ब्रँड काही काळासाठी चर्चेत आला होता.

या पानमसाल्याच्या जाहिरातीबद्दल जेव्हा ASCI ला कळलं तेव्हा त्यांनीसुद्धा ही जाहिरात अधिकृत आहे की नाही याची चौकशी केली. कारण FASSAI च्या नियमांप्रमाणे त्या जाहिरातीत statutary warning दिली गेली नव्हती.

बहुतेक "राफेल" पानमसाल्याचा ब्रँड म्हणून यशस्वी झाला नसेल, परंतु ऑरगॅनिक मोमेंट मार्केटिंगचं इतकं उत्तम उदाहरण दुसरं कुठे पाहायला मिळेल?

 

लेखक : सौरभ पारगुंडे

सबस्क्राईब करा

* indicates required